बारामती : लॉकडाऊनचे उल्लंघन; झाली तीन दिवस कैदेची शिक्षा

Last Updated: Apr 01 2020 7:41PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


बारामती : पुढारी वृत्तसेवा 

लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत सूचनांचे पालन न करणाऱ्या तिघांना बारामती न्यायालयाने प्रत्येकी तीन दिवस कैद व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अफजल बनिमिया आत्तार (वय ३९, रा.श्रीरामनगर बारामती), चंद्रकुमार जयमंगल शहा (वय ३८, रा.सुर्यनगरी, बारामती) व अक्षय चंद्रकांत शहा (वय ३२ रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) असे शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण मोटरसायकल वरून फिरणे, दुकानदाराने सूचनांचे पालन न करणे अशा प्रकारांमध्ये बारामती शहर पोलिसांनी या तिघांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले होते. या खटल्यात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. 

शिक्षा ही शिक्षाच... 

ही शिक्षा कमी वाटत असली तरी त्यात दोषी आढळल्याने संबधिताना शासकीय किंवा खासगी नोकरी मिळणार नाही. त्याचबरोबर भविष्यकाळात पासपोर्ट, शस्त्र परवाना, व्यवसाय परवाने मिळताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. 

आपल्या थोड्या चुकीमुळे आपले स्वतःचे भविष्य अंधारात  टाकणारे हे पाऊल आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे पालन करा. 
- नारायण शिरगावकर, 
  उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती.