Thu, Apr 25, 2019 03:49होमपेज › Pune › निगडी ‘आयटीआय’साठी तीन कोटींचा निधी

निगडी ‘आयटीआय’साठी तीन कोटींचा निधी

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 1:02AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

निगडी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या (आयटीआय) इमारत विस्तारासाठी 2 कोटी 30 लाख आणि डागडुजीसाठी 60 लाख, असे एकूण 2 कोटी 90 लाख रुपयांचा  निधी  पुणे जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला आहे; तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील दलित वस्तींची प्रलंबित कामे मार्गी लावण्याची सूचना केली केली. 

पुण्यातील सर्किट हाऊस येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यतेखाली सोमवारी (दि.4) बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सदस्य शत्रुघ्न काटे, आरती चोंधे, माई ढोरे, जयश्री गावडे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक आयुक्त योगेश कडूसकर आदी उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात पवार यांनी माहिती देताना सांगितले की, निगडी-आकुर्डीतील अंजठानगर येथील आयटीआयची  इमारत वाढविण्यासाठी 2 कोटी 30 लाख आणि डागडुजीसाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर आयटीआय 39 वर्षांपासून सुरू आहे. तेथे 12 ट्रेड असून, एकूण 700 विद्यार्थी संख्या आहे. या निधीमुळे आयटीआयची शैक्षणिक क्षमता अधिक वाढून विद्यार्थ्यांना चांगले प्रकारे प्रशिक्षण देता येणार आहे. 

शहरात एकूण 18 दलित वस्ती निवडण्यात आल्या आहेत. त्यात एकूण 15 ठिकाणी विविध कामे केले जात आहेत. त्यातील 10 ठिकाणची कामे प्रगतिपथावर असून, 5 कोटी 11 लाख रुपयांच्या उर्वरित 5 कामांसाठी शहर सुधारणा समितीची मान्यता शिल्लक आहे. या 14 कामांची एकूण खर्च सुमारे 4 कोटी 10 लाख आहे. 

या योजनेअंतर्गत दलित वस्त्यांमध्ये समाजमंदिर, स्वच्छतागृह, रस्ते आणि दिव्याबत्तीची कामे प्रामुख्याने केली जातात. विशेषतः स्वच्छ भारत अभियानांर्तगत स्वच्छतागृह बांधणीस प्राधान्य दिले जात आहे. या योजनेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होतो. पूर्वी त्याचा पूर्ण विनियोग होत नव्हता. यंदापासून या योजनेतील कामांना गती दिली असून, हा निधी पूर्णपणे खर्च करण्याचे नियोजन असल्याचे पवार यांनी सांगितले. ही कामे महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन योजना विभागाच्या वतीने केले जातात.