Thu, Nov 15, 2018 22:41होमपेज › Pune › पुणे : तरुणीवर सामुहीक बलात्कार; दोघांना अटक

पुणे : तरुणीवर सामुहीक बलात्कार; दोघांना अटक

Published On: Dec 15 2017 10:31AM | Last Updated: Dec 15 2017 10:31AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

कोंढवा येथे तेवीस वर्षीय तरुणीवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तीन तरुणांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास तरउणीवर बलात्कार केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली असून एकजण फरार आहे. 

सतीश जयपाल माने(वय २३), बालाजी मारुती शिंदे(वय ३१) दोघेही का. सिद्धार्थनगर कोंढवा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर फरार असलेल्या साथीदाराचे नाव समजू शकले नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणीचे कुटुंबियाशी भांडण झाल्याने ती घरातून बाहेर पडली आणि नातेवाईकांकडे जाण्यासाठी एका रिक्षात बसली. काही वेळातच रिक्षाचालकाने रिक्षा एका निर्जनस्थळी नेऊन तेथे आपल्या दोन मित्रांसह मिळून तिच्यावर बलात्कार केला.