Sat, Feb 23, 2019 08:53होमपेज › Pune › पुणे : गायीचे मांस विकल्याचा खोटा आरोप करत ५० हजार मागणाऱ्यांना अटक

पुणे : गायीचे मांस विकल्याचा खोटा आरोप; ५० हजार मागणाऱ्यांना अटक

Published On: May 13 2018 3:49PM | Last Updated: May 13 2018 3:49PMपुणे : प्रतिनिधी 

मांस विक्रीसाठी मुंबईला जाणाऱ्या व्यावसायिकाची गाडी  पुण्यात अडवून त्याच्याकडे ५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मेहबुब अब्दुल कुरेशी, देवळे इस्टेट, बारामती पुणे हे त्यांचे भाऊ कासम हसन कुरेशी याचेसह बारामती नगरपरीषदेचे कायदेशीर बीफ मार्केट (कत्तलखाना) येथे गाळा क्रमांक ०६ हा भाडेतत्वावर घेऊन सदर ठिकाणी केवळ म्हैस व रेडा जातीच्या प्राण्यांचे  मांस विक्रीसाठी मुंबई येथे दररोज पाठवित असतात. 

शनिवारी फिर्यादी नेहमीप्रमाणे त्याच्या ड्रायव्हरसह दुपारी १ वाजता बारामतीमधून मुंबईला जाणेसाठी निघाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते कात्रज मार्गावरील नवले पुलाखालून वडगाव बुद्रुक पुणे येथे आले असता दुचाकींवरुन आलेल्या तिघांनी गाडी थांबवून फिर्यादी व त्यांचा ड्राइवर यांना गाडीतून बाहेर ओढून मारहाण करण्यास सुरवात केली. तुम्ही गाडीमध्ये गायीचे मांस भरले आहे. तुम्ही आम्हाला ५० हजार रुपये दया, नाहीतर तुमची गाडी जाळून दोघांना खलास करु, अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी घाबरून आम्हाला अर्धा तासाची वेळ द्या आम्ही तुम्हाला पैसे देतो अशी विनंती केली. आरोपींची नजर चुकवून त्यांनी पोलिसांना संपर्क साधला. सिंहगड तपास पथकातील अधिकारी अवघ्या १५ मिनिटात सदर ठिकाणी पोहचले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. 

फिर्यादीच्या तक्रारीवरून सिंहगड पोलिसांनी मयंक कैलास कांबळे, (वय १९ मु. पो. कुडरो ता. हवेली जि पुणे)सागर दत्तात्रय धावडे (वय २७, रा मु पो कोंडवे धावडेता हवेली जि पुणे)  सूरज नरेंद्र वाल्मीकी, (वय २२, रा न्यु कोपरगाव, उत्तम नगर ता हवेली जि पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. सदर ची कामगिरी डॉ प्रवीण मुंढे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, डॉ शिवाजी पवार, सहा पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, विष्णू जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि गिरीश सोनवणे पोलीस कर्मचारी यशवंत ओंबसे, संतोष सावंत, दयानंद तेलंगे पाटील, निलेश कुलथे, पुरूषोत्तम गुन्ला, शिवानंद कायगुडे,राहुल शेडगे, मयूर शिंदे, सचिन माळवे, वामन जाधव यांच्या पथकाने केली .