Sat, Nov 17, 2018 14:24



होमपेज › Pune › पीएमपीच्या ताफ्यात तीस मिडी बस दाखल

पीएमपीच्या ताफ्यात तीस मिडी बस दाखल

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 17 2018 11:54PM



पुणे : प्रतिनिधी 

खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या 30 तेजस्विनी बस नंतर आता पीएमपीच्या ताफ्यात नव्याने 30 मिडी बस दाखल झाल्या आहेत. या बसपैकी 12 बस मार्गावर आल्या आहेत, तर 18 बसेसच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.  पुढील दोन-तीन दिवसांत उर्वरित बसेस सुध्दा मार्गावर येणार आहेत. 

पुढील काही काळात ‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे दोनशे मिडी बस येणार आहेत. त्याचा प्रवाशांना नक्कीच लाभ होणार आहे. सध्या दोनशे मिडी बसेस पैकी 30 बस  महिला दिनापासून मार्गावर धावू लागल्या आहेत. मार्च महिनाअखेरपर्यत अजुन किमान  99 बस मार्गावर आणण्यासाठी प्रशासन नियोजन करीत आहे. सध्या 30 महिला विशेष बसेससह दोन दिवसांपुर्वी आणखी 12 बस मार्गावर धावत आहेत. तर कंपनीकडून आणखी 18 बस पीएमपीला मिळाल्या आहेत.

पीएमपीमधील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वारगेट आगाराकडे नवीन 12 मिडी बसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच येऊ घातलेल्या  99 बसेसचे मार्ग व वेळापत्रक निश्चित झाले आहे.हे वेळापत्रक  संबंधित आगारांकडे देण्यात आले आहे.

 

Tags : pune, pune news,  municipal corporation, MIDI bus, Special women,