Sun, Mar 24, 2019 08:41होमपेज › Pune › स्पर्धा परीक्षा उमेदवारांची  तपासणी गांभिर्याने नाहीच

स्पर्धा परीक्षा उमेदवारांची  तपासणी गांभिर्याने नाहीच

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:55AMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्‍त पूर्व परीक्षा तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) लेखनिक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा या दोन्ही परीक्षा रविवारी पार पडल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थी एका परीक्षेला मुकले. त्यातच परीक्षा केंद्रांवर स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांची कडक तपासणी करण्याचे गांभिर्य संबंधित यंत्रणेने दाखवले नसल्याचा आरोप करत सुरक्षा यंत्रणाच ढिसाळ असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्षाधिकारी या पदासाठी आयोगामार्फत एक वर्षापासून एकच संयुक्‍त पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. तसेच पीडीसीसी बँकेच्या लेखनिक पदासाठी तब्बल 393 पदांसाठी देखील सुमारे 5 वर्षानंतर परीक्षा घेण्यात आली. पीडीसीसी बँकेच्या परीक्षेसाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.तर लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षेत विद्यार्थ्यांची तपासणी गांभिर्याने केली गेली नसल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी केला आहे.

स्पर्धा परीक्षा उमेदवार महेश बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर बोलवून उमेदवारांची पोलिसांमार्फत तपासणी करण्यात आली नाही. सामान्य प्रशासन विभागाने यासाठी दिनांक 12 एप्रील रोजी शासन निर्णय काढला आहे. पोलिसांनी उमेदवारांची तपासणी करावी त्यासाठी आयोगाकडून त्यांना मानधन देखील देण्यात येणार होते. आयोगाने दिलेल्या वेळेच्या आत उमेदवार परीक्षा केंद्रावर येत नव्हते. केंद्राच्या आत सोडण्याची वेळ 10 असताना देखील 10.45 नंतर देखील आत सोडण्यात आले. केंद्रावर उमेदवारांची मुळ ओळखपत्र देखील तपासण्यात आली नाहीत. केंद्राच्या आत सॅक व मोबाइल घेवून जाण्यास बंदी असताना सुद्धा बर्‍याच केंद्रावर वस्तु आत नेऊन देण्यात आल्या. तसेच नियमावली ठरवली तिला तीलांजली देण्यात आली.