Thu, Jun 27, 2019 01:58होमपेज › Pune › पुण्यातील आयपीएल सामने ठरल्यानुसारच

पुण्यातील आयपीएल सामने ठरल्यानुसारच

Published On: Apr 18 2018 8:01PM | Last Updated: Apr 18 2018 8:01PMसुनील जगताप

पुणे ः ‘आयपीएल’साठी पवना धरणातले पाणी वापरू नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) दिले असले तरी त्याचा पुण्यातील सध्या प्रस्तावित चेन्नईच्या सामन्यांवर काहीही परिणाम होणार नाही. हे सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील. सध्याच्या हंगामासाठी पवना धरणातील पाणी वापरण्याची गरजच नाही. कारण  ‘एमसीए’कडे 32 सामन्यांना पुरेल, इतके पाणी गहुंजे स्टेडियममध्ये शिल्लक आहे. 

चेन्नईत कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून झालेला विरोध लक्षात घेता आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने चेन्नईतले सामने पुण्याला हलवले आहेत. मात्र, ‘लोकसत्ता’ संघटनेतर्फे आयपीएल सामन्यांमध्ये पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली. आयपीएल सामन्यांसाठी खेळपट्टीची निगा राखायला 60 लाख लिटर पाण्याची नासाडी होईल. त्यामुळे आयपीएल सामने महाराष्ट्रात खेळवू नयेत, अशी मागणी याचिकेत केली गेली. या प्रकरणातील पुढील सुनावणीपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने, आयपीएलच्या सामन्यांसाठी पाण्याची व्यवस्था कशी करणार यासंदर्भात विचारणा केली होती. 
 

Tags : pune, pune news, IPL matches, water, MCA president,