Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Pune › सत्तेचा संसार अन् काडीमोडचे नाटक 

सत्तेचा संसार अन् काडीमोडचे नाटक 

Published On: May 27 2018 1:21AM | Last Updated: May 27 2018 1:20AMपिंपरी : प्रतिनिधी 

26 मे रोजी संसदभवनच्या पायरीला नतमस्तक होऊन पंतप्रधानपदाची शपथ घेणार्‍या नरेंद्र मोदींनी दिलेले एकही आश्‍वासन अद्याप पूर्ण केले नाही. निवडणुक जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण न करता नोटाबंदी, जीएसटी अशा अन्यायकारक निर्णयामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्या विरोधात शहरात पहिल्यांदा काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. सेना सध्या भाजपच्या विरोधात आंदोलने घेण्याचा दिखावा करत आहे; मात्र भाजप शिवसेनेचा हा सत्‍तेचा संसार असून काडीमोडचे नाटक करत असल्याची टिका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. 

या वेळी माजी महापौर कविचंद भाट, प्रदेश सदस्य संग्राम तावडे, प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, प्रदेश मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष गौतम आरकडे, शहाबुद्दीन शेख, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, मयुर जैयस्वाल आदी उपस्थित होते.  

साठे म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीत मतदान झालेल्या 31 टक्केमतदारांनी भाजपाकडे विश्‍वासाने सत्ता सोपविली; परंतू नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने देशातील जनतेचा विश्‍वासघातच केला आहे. त्यामुळे आगामी काळात ‘26 मे’ हा दिवस विश्‍वासघात दिवस म्हणून पाळला जाईल. आगामी 2019 लोकसभा निवडणूकीत देशातील 125 कोटी जनता भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षांना नाकारणार आहे.  मागील या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले. देशभरातील शेती उत्पादनाला हमी भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करित आहेत.

परदेशातील काळा पैसा 100 दिवसात आणू व सर्वांच्या खात्यात 15 लाख रूपये भरू म्हणणारे मोदी हे नीरव मोदी, विजय मल्ल्या, पीएनबीमधील भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या खात्याध्ये मात्र हजारो कोटी भरले. त्यावर मोदी का बोलत नाहीत. बेरोजगारी, भूकबळी, शेतकरी आत्महत्या, वाढती महागाई यावर निर्णय न घेतला स्वत:च्या जाहिरातींवर हजारो कोटी खर्च पाच हजार कोटी करणार्‍या मोदींना जनतेच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायलाच हवीत. पेट्रोल, डीझेल जीएसटी अंतर्गत न घेता रोज सकाळी भाववाढ करून 10 लाख कोटींचा डाका जनतेच्या खिशावर सरकारने टाकला आहे. 

शहरातील प्रश्‍न सोडविण्यासाठी दिलेले आश्‍वासन पुर्ण केलेले नाही. पीएमआरडीए विलीनीकरण करण्याचा घाट आहे. त्यामध्ये आर्थिक गणित आहे. शास्तीकर कमी करण्याचे आश्‍वासन दिले असतानाही कमी केला नाही. पालकमंत्र्यांनी नवीन एकही प्रकल्प आणला नाही. निवडणुकीच्या तोंडावर लष्कराने बंद केलेले रस्ते खुले करण्याचा दिखावा, केला जात असल्याचा आरोप या वेळी साठे यांनी केला.