Thu, Nov 15, 2018 12:31



होमपेज › Pune › राज्यात आता कुठेही स्वस्त धान्य घेता येणार

राज्यात आता कुठेही स्वस्त धान्य घेता येणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी 

राज्याच्या पुरवठा विभागाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सुधारणेसाठी आधार बेस्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन (एईपीडीएस) ही प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून राज्यात कोणत्याही शहरातील स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्ड धारकाला धान्य खरेदी करता येणार आहे. 

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेसह अन्य रेशन कार्डधारकांना (पांढरे आणि केशरी) रेशन कार्डला आधारजोडणी करणे बंधनकारक आहे. बनावट लाभार्थींना वगळून गरजूंपर्यंत धान्य पोचावे यासाठी आधारसक्ती करण्यात आली. मात्र, जर आधारजोडणी नसेल तरी ‘ई-पॉस मशिन’वर ‘थंब इम्प्रेशन’द्वारे कुटुंबातील सदस्यांना धान्य वितरित केले जात आहे. पुणे आणि परभणी जिल्ह्यात एईपीडीए प्रकल्प प्रयोगिक तत्त्वावर राबविण्यात आले.

त्याला मिळालेल्या यशानंतर एक एप्रिलपासून एईपीडीएनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये धान्याचे वाटप केले जाणार आहे. रेशनकार्डधाकांना आधार लिंक आवश्यक असून, ज्यांचे आधार लिंक झाले नाही, त्यांना तात्पुरत्या स्वरूपात कूपन दिले जाणार आहे. त्यावरून तो धान्य खरेदी करू शकतो. या प्रणालीमुळे सार्वजनिक धान्य वितरणामध्ये पारदर्शकता आली असून, यातून काळाबाजार थांबण्यास मदत झाली आहे. सर्व्हरच्या समस्येमुळे पुणे आणि गोंदिया येथे ही प्रणाली कार्यान्वित होण्यास विलंब झाला आहे.






  •