Wed, Dec 19, 2018 22:06होमपेज › Pune › आळंदीत दुर्गामातेच्या मूर्तीची चोरी 

आळंदीत दुर्गामातेच्या मूर्तीची चोरी 

Published On: Jun 30 2018 12:11PM | Last Updated: Jun 30 2018 12:11PMपिंपरी : प्रतिनिधी

आळंदी येथील साई मंदिरातून चार लाख रुपये किंमतीची दुर्गामातेची मूर्ती चोरून नेल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी-चऱ्होली येथे साई मंदिर आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास येथील साई मंदिराच्या आत असलेल्या दुर्गामातेची चार किलो वजनाची पितळी मूर्ती चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरून नेली. याबाबत दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.