Sat, Nov 17, 2018 12:33होमपेज › Pune › चर्‍होलीतील मंदिरातून  देवीच्या मूर्तीची चोरी

चर्‍होलीतील मंदिरातून  देवीच्या मूर्तीची चोरी

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:19AMपिंपरी : प्रतिनिधी

चर्‍होली येथील दुर्गामाता मंदिरा गाभार्‍यातील पितळी मूर्ती चोरट्यांनी चोरून नेली. घटना बुधवार (दि.27) रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. 

याप्रकरणी पुजार्‍याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चर्‍होलीतील वडमुखवाडी येथे साई मंदिर आहे.

या मंदिराच्या गाभार्‍यात दुर्गामातेची देखील एक मूर्ती आहे. फिर्यादी नेहमीप्रमाणे देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी गेले असता त्यांना देवीची मूर्ती चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ दिघी पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.