Fri, Sep 21, 2018 15:49होमपेज › Pune › ओएलएक्सची आयडीया, टेस्ट राईडच्या बहाण्याने दुचाकी पळवल्या

ओएलएक्सची आयडीया, टेस्ट राईडच्या बहाण्याने दुचाकी पळवल्या

Published On: Dec 28 2017 10:42AM | Last Updated: Dec 28 2017 10:42AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

ओएलएक्सवर दुचाकी विक्रीच्या जाहिराती पाहून दुचाकी मालकाशी संपर्क साधत दुचाकीची टेस्ट राईड घेण्याच्या बहाण्याने दुचाकी पळवणार्‍या एकाला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याने  चोरी केलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

राहुल मांगीलाल प्रजापती (22, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात  आलेल्याचे नाव आहे. बोपोडीतील परवेज मन्यार यांनी ओएलक्सवर दुचाकी विक्रीची  हिरात केली होती. राहुल प्रजापती याने त्यांना फोन करून संपर्क साधला. त्यानंतर दुचाकी पाहण्यासाठी तो मन्यार यांच्याकडे आला. मन्यार यांच्या मुलाला तो भेटला. दुचाकीची टेस्ट ड्राईव घ्यायची आहे  असे त्याने सांगितले. त्यानंतर तो टेस्ट ड्राईव घेण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन गेला तो परत आलाच नाही. हा प्रकार 16 डिसेंबर रोजी घडला होता. त्यानंतर त्यांनी दुचाकीचा शोध घेतला; मात्र ती न  मिळाल्याने खडकी पोलिसांकडे तक्रार दिली. खडकी पोलिसांचे तपास पथकातील कर्मचार्‍यांना  माहिती मिळाली की, राहुल प्रजापती हा शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आला आहे. त्यावेळी खडकी पोलिसांनी त्याला तेथूनदुचाकीसह ताब्यात घेतले.