Sun, May 19, 2019 22:32होमपेज › Pune › पर्सनल लोनच्या बहाण्याने महिलेला १५ लाखांचा गंडा

पर्सनल लोनच्या बहाण्याने महिलेला १५ लाखांचा गंडा

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 1:07AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पर्सनल लोन मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेला 15 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

कोढव्यातील 52 वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली असून, जुलै 2016 ते डिसेंबर 2017 दरम्यान हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2016 मध्ये फिर्यादी महिलेला एकाने फोन केला. त्यानंतर या महिलेला पर्सनल लोन देण्याचे आमिष दाखवले.

महिलेने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर त्यांना प्रोसेसिंग फी आणि इतर कारणांनी वेळोवेळी बँकेमध्ये पैसे भरायला लावले. 15 लाख रुपये बँक खात्यात जमा करूनदेखील डिसेंबर 2017 पर्यंत महिलेला लोन मिळत नसल्याने या महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत शिंदे करीत आहेत.