Sat, Apr 20, 2019 07:52होमपेज › Pune › मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आत्मदहनाचा ठेकेदाराचा इशारा

मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आत्मदहनाचा ठेकेदाराचा इशारा

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 10 2018 1:00AMपिंपरी : प्रतिनिधी

संत नामदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज भेटीच्या समूहशिल्पाऐवजी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भीमसृष्टीचे काम देण्यासाठी पालिकेच्या एका अधिकार्‍याने 10 लाखांची रक्कम घेऊन फसवणूक केली आहे. संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करून आपली रक्कम परत करावी, या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 25 एप्रिलला आत्मदहन करण्याचा इशारा ठेकेदार मूर्तीकार सुभाष आल्हाट यांनी दिला आहे. 

आल्हाट याचे मूर्ती घडविण्याचे आल्हाट आर्ट स्टुडिओ आहे. पालिकेकडून आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी येथे संत नामदेव व संत ज्ञानेश्वर महाराजांचे समूहशिल्प उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी इच्छुक असताना ते काम दुसर्‍या ठेकेदाराला दिले गेले. त्यानंतर पिंपरीतील भीमसृष्टीचे काम मिळवून देण्याची ग्वाही पालिकेतील एका अधिकार्‍याने दिली. त्याच्या सांगण्याप्रमाणे निविदा भरून व व्यवहार करूनही हे काम आल्हाट यांच्याऐवजी प्रतिस्पर्धी ठेकेदारास देण्यात आले. 

हेतूपुरस्कर अंधारात ठेवून डावलून हे काम दुसर्‍या ठेकेदाराला देण्यात आले. त्यात 10 लाख रुपये घेऊन फसवणूक करण्यात आल्याची तक्रार आल्हाट यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यामध्ये त्याचे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले आहे. याला जबाबादार अधिकारी व संबधितांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी वारंवार आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली. तसेच, एका दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले. मात्र, पालिका प्रशासन कोणतीही कारवाई न करता संबंधित अधिकार्‍याला पाठीशी घालत असल्याचा आरोप आल्हाट यांनी केला आहे. मागासवर्गीय मूर्तीकाराला प्रशासन दाद देत नसून, पालिका प्रशासनाचा कारभाराला कंटाळून त्यांनी 25 एप्रिलला  मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

 

Tags : Pimpri, Pimpri news, contractor, suicides,