Tue, Sep 25, 2018 14:56होमपेज › Pune › वरिष्ठ महाविद्यालयांच्या रिक्‍त जागा लवकरच भरणार 

वरिष्ठ महाविद्यालयांच्या रिक्‍त जागा लवकरच भरणार 

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील प्राचार्य भरतीवरील बंदी राज्य शासनाने उठविली असली तरी सहायक प्राध्यापक भरतीवर असलेले निर्बंध अद्याप कायम आहेत. प्राध्यापक भरतीवर असलेल्या बंदीमुळे राज्यातील सहायक प्राध्यापकपदाच्या तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जवळपास 18 हजारांपेक्षा जास्त जागा रिक्‍त आहेत. त्यामुळे सहायक प्राध्यापक; तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या रिक्‍त जागा लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी दिली आहे.

प्राचार्य भरतीची बंदी उठल्यानंतर प्राध्यापक भरती; तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची बंदी कधी उठणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

यासंदर्भात डॉ. धनराज माने म्हणाले, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत राज्यात जवळपास 1 हजार 171 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या 18 हजारांपेक्षा जास्त जागा रिक्‍त आहेत. सध्या या महाविद्यालयांमधील प्राचार्यभरतीवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्याच पध्दतीने येत्या काही दिवसांमध्ये सहायक प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरतीवरील बंदीदेखील उठवण्यात येणार असून, दोन्ही प्रकारच्या कर्मचार्‍यांची भरती करण्याची संधी महाविद्यालयांना मिळणार आहे.