Thu, Nov 22, 2018 16:47होमपेज › Pune › घरफोड्यांसाठी चक्क चारचाकीचा वापर...

घरफोड्यांसाठी चक्क चारचाकीचा वापर...

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:36AMपुणे : प्रतिनिधी

शहरात घरफोड्या करणार्‍या चोरट्यांचा सुळसुळाट काही केल्या थांबताना दिसत नाही. आता तर या चोरट्यांनी चक्क चारचाकी वाहनांतून घरफोड्यांची कामगिरी सुरू केली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, चोरट्यांच्या या नव्या ‘फंड्या’ला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनाही नव-नव्या युक्त्या योजाव्या लागत आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात दिवसाला साधारण तीन ते चार घरफोड्या होत आहेत. पोलिसांसाठी ही एक डोकेदुखीच ठरत असल्याने, या घटना रोखण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना आखल्या आहेत; तरीही घरफोड्यांचे प्रकार काही आटोक्यात येताना दिसत नाहीत.