Sun, Mar 24, 2019 10:52होमपेज › Pune › पार्किंगमधील दुचाकी पेटवल्या

पार्किंगमधील दुचाकी पेटवल्या

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 12:59AM

बुकमार्क करा

पुणे/वारजे : प्रतिनिधी 

वारजे गार्डन सिटीलगत असलेल्या म्हाडा वसाहतीमधील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या तीन दुचाकी अज्ञातांनी पेटवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सकाळ 8 वाजता घडली. याबाबत शिवाजी रघुनाथ शिंदे (वय.38 रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुपसार, वारजे माळवाडी परिसरात असलेल्या म्हाडा वसाहती मधील ‘जे’ इमारतीच्या पार्किंग मध्ये लावण्यात आलेल्या होंडा शाईन ( एमएच 12 केएच 6436), होंडा स्कूटर (एमएच 12 एटी 7897 )आणि टीव्हीएस स्कुटी (एमएच 12 डीसी 9097 ) या तीन दुचाकी आज गुरुवार सकाळी आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवल्याची घटना घडली. काही दिवसांपूर्वी वारजे माळवाडीसह रामनगर परिसरात गाड्या फोडण्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा गाड्या जाळण्याची घटना घडली.

या वारजे परिसरात गाडी जाळण्याची ही आठवी घटना असल्याचे परिसरातील नागरिक सांगत असून पेट्रोल चोरी होणे, वाहनांची तोडफोड करणे, वाहने पेटवून देणे या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण आहे.