होमपेज › Pune › पुण्यात हुडहुडी; पारा १० अंशांखाली

पुण्यात हुडहुडी; पारा १० अंशांखाली

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 26 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे शहराचा किमान तापमानाचा पारा गुरुवारी दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने पुणेकर गारठून गेले. शहरात 9.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या 10-12 दिवसांपासून शहराचा किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या जवळपास रेंगाळत होता. दि. 21 रोजी 10.9 तर, दि. 22 रोजी 10.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले होते. 

गुरुवारी मात्र किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली उतरल्याने पुणेकर पुरते कुडकुडून गेले. पहाटेच्या वेळी शहर व परिसरात गार वारे वाहत असल्याने घराबाहेर पडणार्‍या नागरिकांची संख्या तुरळक दिसली. बहुतांश ठिकाणी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, तर अनेकांनी अमृततुल्यांमध्ये जात गरमागरम चहाचा अस्वाद घेणे पसंत केले. दरम्यान, पुढील 2-3 दिवस शहर व परिसरात पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका कायम राहणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.