Thu, Aug 22, 2019 09:03होमपेज › Pune › शहरातील सीबीएसई शाळांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

शहरातील सीबीएसई शाळांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

Published On: May 27 2018 1:21AM | Last Updated: May 27 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई) चा बारावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. सीबीएसईचा बारावीचा निकाल 83.01 टक्के इतका लागला. पुणे शहरतील सीबीएसई बोर्डाच्या सर्रास शाळांनी बारावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल लावत यावर्षीही घवघवीत यश संपादित केले आहे. 

शहरातील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या अयुषी कश्यप या विद्यार्थींनीने विज्ञान शाखेत 92.8 टक्के गुण मिळवले. तर वाणिज्य शाळेत शाळेच्या जुली पटवर्धन या विद्यार्थ्यांनी 95 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर कोंढवा येथील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलचा वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 99 टक्के लागला आहे. शाळेच्या अश्‍विन शैनाई याने विज्ञान शाखेत 96.6 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमाक पटकावला. तर वाणिज्य शाखेत सात्विक बन्सल याने 90.6 टक्के गुण मिळवून टॉप केल्याची माहिती शाळेच्या मुख्याद्यापिका प्रज्ञा गोखले यांनी दिली. 

तसेच अक्षरा इंटरनॅशनलच्या श्रुती भागवत या विद्यार्थीीनीने विज्ञान शाखेत 95.40 टक्के गुण मिळवले. तर शाळेच्या एकूण विद्यार्थ्यांच्या 39.28 टक्के विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तर ऑर्किड स्कूलच्या 86 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थ्यांनी 91 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले. 

खडकी येथील आर्मी पब्लीक स्कूल शाळेचाही यावर्षी 100 टक्के निकाल लागला आहे. तर शाळेतील 3 विद्यार्थ्यांनी गणित, आयपी आणि मानसशास्त्र विषयात 100 गुण मिळविले आहेत. शाळेच्या अरुनिमा बंडोपाध्याय हिने 96.2 टक्के गुण विज्ञान शाखेत, तर  मनवी पांडे हिने 96.4 टक्के गुण मिळवून मानवता शाखेत, तर झेनाह सोमजी हिने 96 टक्के गुण वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकावला, अशी माहिती शाळेच्या प्राचार्य आरती शर्मा यांनी दिली. 

वाघोली येथील द लेझिकॉन इंटरनॅशनल शाळेच्या 11 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. शाळेच्या सिध्दार्थ रघुवंशी याने 94.6 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत, तर रिया झा हिने 92.2 टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम आल्याची माहिती शाळेच्या प्राचार्य गुरसिमरन कौर यांनी दिली. 

दिल्ली पब्लिक स्कुल मधील उत्कर्ष सिंघानिया या विद्यार्थ्यांने 97.2 टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवला. त्याखालोखाल रय्यन शब्बिर खान या विद्यार्थ्याने 97 टक्के गुण मिळवून मानवता शाखेत, तर श्रुती निषित हिने 96.2 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला, अशी माहिती शाळेकडून देण्यात आली. जी जी इंटरनॅशनल स्कूल मधील 87 विद्यार्थ्यांपैकी 44 टक्के विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. शाळेतून विज्ञान शाखेत सांची थवानी हिने 95.4 टक्के गुण, तर वाणिज्य शाखेत मानसी गुप्ता हिने 95 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. वानवडी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल मधील शॅरॉन माथूर हिने 97 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर संस्कृती शाळेचा निकाल यावर्षीही 100 टक्के लागला असून आदर्श निंगानुर याने 94 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.

सर्रास शाळांचा निकाल 100 टक्के

ताथवडे येथील जेएसपीएम ब्लॉसम स्कूलचा निकाल यावर्षी 100 टक्के लागला. शाळेतील 15 विद्यार्थ्याना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. पूर्वा मोघेकर हिने 95.4 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत पहिली आली आहे. कॅम्प परिसरातील आर्मी पब्लिक स्कूलचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेतील परीक्षेला बसलेल्या 311 विद्यार्थ्यांपैकी 211 विद्यार्थ्यांनी 80 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. तर 26 विद्यार्थ्यांनी 95 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. शाळेच्या आस्था तिवारी हिने मानवता या शाखेत 98.4 टक्के गुण, तर अभिनव शंकर आणि जय कर्हाडे यांनी विज्ञान शाखेत 96.8 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर यश शर्मा याने वाणिज्य शाखेत 96.2 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.