Tue, Nov 13, 2018 08:37होमपेज › Pune › कलचाचणी महिनाअखेर पूर्ण करण्याचे बोर्डाचे आदेश

कलचाचणी महिनाअखेर पूर्ण करण्याचे बोर्डाचे आदेश

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:30AMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माध्यमिक शालान्त परीक्षेस (इयत्ता दहावी) प्रथम प्रविष्ट होणार्‍या नियमित व खासगी विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कलचाचणी घेण्यात येत आहे. याची सुरुवात शनिवार दि. 10 रोजी करण्यात आली आहे; परंतु ही कलचाचणी येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत घेऊन पूर्ण करावी अशा प्रकारचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.

सदर कलचाचणी संगणकावर घ्यायची आहे. त्यासाठी संगणक प्रणाली मंडळाच्या संकेतस्थळावर शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहे. शाळांनी संकेतस्थळावरून सदर प्रणाली डाऊनलोड करून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना कलचाचणी सात माध्यमातून देता येणार आहे. माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांने निवडलेल्या माध्यमातून त्याला कलचाचणी देता येईल. हे विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणून द्यावे. 

शाळांनी कलचाचणीचे नियोजन करताना रविवार व शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी कलचाचणी घेण्यास हरकत नाही. कलचाचणी देणार्‍या विद्यार्थ्याची स्वाक्षरी उपस्थिती पत्रकात घेऊन ती उपस्थिती पत्रके कलचाचणी पूर्तता प्रमाणपत्रसह विभागीय मंडळ कार्यालयात जमा करावी, अशा सूचना मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या आहेत.