Thu, Jul 18, 2019 16:32होमपेज › Pune › गुंडगिरी, दहशतीला घाबरू नका, मी आहे 

गुंडगिरी, दहशतीला घाबरू नका, मी आहे 

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:49AMपिंपरी : संजय शिंदे 

गेली तीन, साडे तीन वर्षे भोसरीच्या राजकारणावर भाष्य करण्यास टाळणारे माजी आ. विलास लांडे यांनी माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलनात मौन सोडले. गुंडगिरी, भाईगिरी कोण करत असेल तर त्याला भिऊ नका, काळजी करु नका, मी आहे, मी कोणाला भित नाही, तुम्ही ही भिऊ नका असा विश्वास दिल्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये बळ मिळण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वपक्षातील पदाधिकार्‍यांमुळे झालेला पराभव लांडे यांना जिव्हारी लागला. त्यांनी पक्षापासून चार हात लांब राहण्याचे धोरण अवलंबले. दरम्यान ते भाजपा, शिवसेनावासी होणार अशा वावड्या उठत होत्या. संधी मिळेल तेथे ज्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खूपसला त्यांच्यावर ते जाहीरपणे बोलत होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीला रामराम करणार असे जवळपास निश्‍चित झाले असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्याबरोबर त्यांची खोलीबंद चर्चा झाल्यानंतर लांडे पक्षात पुन्हा सक्रिय झाले.

भोसरीमध्ये मंगळवारी (दि.10) हल्लाबोल आंदोलन झाले. गेल्या चार वषार्ंत प्रथमच राष्ट्रवादीच्या जाहीर सभेला मोठा जनाधार लाभला होता; हल्लाबोलच्या अनुषंगाने भाजपावर अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे तोफ डागणार हे सर्वांना माहित होते; परंतु विलास लांडे भोसरीबाबत मौन सोडणार का याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे व विरोधकांचे लक्ष होते. त्यानुसार लांडे यांनी भोसरीत सध्यस्थितीवर भाष्य करत, भोसरी विधानसभा मतदारसंघासह पूर्ण शहराचा विकास यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या माध्यमातून झाला आहे. तो वारसा चालविण्याचे काम अजित पवारांनी केले आहे. शहराचे बदलले रुप व विकासात्मक कामे ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच झाली आहेत.

मात्र सध्यस्थितीला भोसरी व परिसरामध्ये मोठ्याप्रमाणावर दहशत, गुंडगिरी, केली जात आहे. बिहारकडे वाटचाल सुरू आहे की काय अशी शंका उपस्थित करत यापुढे कोणाला भिऊ नका. मी तुमच्याबरोबर आहे,  असा विश्वास व्यक्त केल्यामुळे हल्लाबोल सभेच्याठिकाणी कार्यकत्यार्ंनी एकच जल्लोष केला. काही जण विलास लांडे राष्ट्रवादीत राहणार का असा सवाल उपस्थित करत आहेत; मात्र त्यांना उत्तर देताना माझ्या बापाचे नाव विठोबा आहे आणि तो राजकारणातील शरद पवार आहे असे सांगत आम्ही राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत हे सांगण्यास ते विसले नाहीत.