Tue, Sep 17, 2019 22:01होमपेज › Pune › ‘पुरुषोत्तम’चा पडदा १६ ऑगस्टला उघडणार

‘पुरुषोत्तम’चा पडदा १६ ऑगस्टला उघडणार

Published On: Jun 12 2019 8:34PM | Last Updated: Jun 12 2019 8:34PM
पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्रीय कलोत्‍पासक संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा पडदा 16 ऑगस्टपासून उघडणार आहे. 30 ऑगस्टपर्यंत या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, स्पर्धेची अंतिम फेरी 14 आणि 15 सप्टेंबर रोजी पार पडेल. या स्पर्धेचे यंदा हे 55 वे वर्ष आहे.   

स्पर्धेचे प्रवेश अर्ज 14 आणि 15 जुलै रोजी महाविद्यालयीन संघांना दिले जाणार आहेत. हे अर्ज 3 आणि 4 ऑगस्ट रोजी स्वीकारण्यात येणार आहेत. मागील वर्षी स्पर्धेमध्ये सहभागी 51 संघांपैकी 41 संघांचा प्रवेश निश्चित आहे. तर, तळातील 10 संघ आणि नव्याने सहभागी होऊ इच्छिणारे संघ अशा एकूण 51 संघाची नावे निश्चित करण्यात येणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी या महाविद्यालयीन संघांना तारखांचे वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ 19 किंवा 20 सप्टेंबर रोजी नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते पार पडेल. संपूर्ण स्पर्धा सदाशिव पेठेतील भरत नाटय संशोधन मंदिर येथे आयोजीत करण्यात आली आहे.