Tue, Apr 23, 2019 10:02होमपेज › Pune › स्कुलबस बंद मुळे पालक हवालदिल

स्कुलबस बंद मुळे पालक हवालदिल

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

शहरात ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट संघटनेच्यावतीने चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे.  आंदोलनात विविध संघटना, स्कूलबस मालक- चालकांनी सहभाग घेतला होता. परिणामी शहरातील बहुतांश शाळांतील विद्यार्थी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना शाळेत सोडविण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली. स्कुलबस बंद असल्यामुळे  पीएमपी बस, रिक्षा आणि दुचाकीवरुन विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागला.

चक्का जाम आंदोलनात स्कुलबस चालक-मालकांनी सहभाग घेतला होता. परिणामी बस बंद असल्याने शिवाजीनगर, स्वारगेट सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्त्यांसह विविध परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना आंदोलनाचा फटका सहन करावा लागला. विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी पालकांना कसरत करावी लागली. शुक्रवारी सकाळपासून संततधार रिमझिम पावसामुळे शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागल्याचे चित्र दिसून आले. स्कुलबस बंद असल्यामुळे विविध भागातील पालकांना शाळेत विद्यार्थी पोचविण्यासाठी उशीर झाला होता. तसेच बहुतांश शाळा सकाळच्या सत्रातील असल्याने विद्यार्थी वेळेवर शाळेत सोडण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली. तसेच वाहतुकीसाठी सोय उपलब्ध नसल्यामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत उशिरा 

येण्याची सूट दिली होती. एकाच कुटुंबातील दोन ते तीन विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करत ट्रीपलसीट प्रवास करावा लागला.शहरातील बहुतांश स्कुलबस संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक ठप्प झाली होती. पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे पालकांना दुचाकी प्रवासाद्वारे विद्यार्थ्यांना ने-आण करावी लागल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी पालकांना कामावर जाण्यासाठी उशीर झाला होता. विविध शाळेतील विद्यार्थ्यांना रिक्षाप्रवास आणि स्कुलव्हॅनद्वारे शाळेत उपस्थित राहावे लागले. विद्यार्थ्यांच्या घराजवळ स्कुलबस न आल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला . सकाळी आणि सायंकाळी पावसाच्या संततधार रिपरिपीमुळे विद्यार्थ्यांना दुचाकीवर भिजत प्रवास करावा लागल्याचे चित्र आढळून आले.

विद्यार्थ्यांनी लुटला स्कुलबस नसल्याचा आनंद

शाळेत ये-जा करण्यासाठी एरवी विद्यार्थ्यांना साचेबद्ध वेळेत ठरलेल्या थांब्यावर बसची वाट पाहत थांबावे लागते. शुक्रवारी मात्र, स्कुलबस नसल्यामुळे पालक घरी नेण्यासाठी येईपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी मित्रांसमवेत पावसाचा आनंद लुटला. तसेच अनेकांनी बसप्रवासास प्राधान्य दिले होते. दरम्यान, स्कुलसब नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा वेळ मुलांना शाळेतून घरी नेण्यात गेला होता. सायंकाळच्या वेळेत वाहतूककोंडीचा सामना पालकांना करावा लागल्याचे दिसून आले.