Sun, Dec 15, 2019 04:40होमपेज › Pune › दोन कोटींसाठी सरपंच महिलेचा पतीकडूनच खुनाचा प्रयत्न

सरपंच महिलेचा पतीकडूनच खुनाचा प्रयत्न

Published On: Jun 25 2019 2:22PM | Last Updated: Jun 25 2019 2:22PM
पिंपरी : प्रतिनिधी 

क्रीडानगरी अशी ओळख असलेल्या गहुंजे गावच्या सरपंच महिलेचा पतीने गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सरपंच शीतल किरण बोडके (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती किरण निर्घृन बोडके (३८, रा.भूमकर चौक, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी किरण याने सरपंच शीतल यांच्याकडे माहेरहून दोन कोटी रुपये आणण्याची मागणी केली. तर किरण याने शीतल यांचा शारीरिक व मानसिक छळ देखील केला. किरण याचे परस्त्रियांशी अनैतिक संबंध असून याबाबत शीतलने विचारणा केली असता किरण याने त्यांना वारंवार मारहाण केली. बुधवारी (दि.१९) रोजी रात्री या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी चिडलेल्या किरणने 'तुला मारूनच टाकतो' असे म्हणत शीतल यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.