Sat, Jan 19, 2019 06:59होमपेज › Pune › देवाला अर्पण केलेल्या पैशांवरचा पुजार्‍यांचा हक्क संपला

देवाला अर्पण केलेल्या पैशांवरचा पुजार्‍यांचा हक्क संपला

Published On: Jan 12 2019 1:33AM | Last Updated: Jan 12 2019 1:33AM
पुणे : प्रतिनिधी 

भाविकांकडून देवासमोर अर्पण केलेल्या पैशांमध्ये कोणत्याही खासगी व्यक्‍तीस हक्‍क सांगता येणार नाही, अथवा हिस्सा घेता येणार नाही असा निकाल जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी दिला आहे. देवापुढील थाळी अथवा गुप्तदान पेटीमध्ये अर्पित उत्पन्न हे पूर्णपणे त्या मंदिराच्या ट्रस्टची मिळकत असून, त्या रकमेचा विनियोग त्या देवस्थानच्या उद्दिष्टांसाठी व भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी करण्यास संबंधित ट्रस्टचे विश्वस्त जबाबदार आहेत, असेही त्यांनी निकालात नमूद केले आहे. 

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या रांजणगाव गणपती येथील पुजारी प्रसाद व मकरंद कुलकर्णी यांनी श्री महागणपतीसमोर थाळीमध्ये अर्पण केलेली रक्‍कम पूर्णत: त्यांना घेण्याचा हक्‍क आहे, असे दिवाणी न्यायालयाने घोषित करावे, असा दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयान वरील आदेश दिला आहे. 

दोन्ही बाजूंचा युक्‍तिवाद व दाखल कागदपत्रांच्या आधारे जिल्हा न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा पुजार्‍यांना देवापुढील दानातून दरमहा पंचवीस हजार ट्रस्टने देण्याचा निकाल रद्दबातल करून देवापुढील दान हे देवस्थान ट्रस्टचे उत्पन्न असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल निकाल दिला आहे.