परतीचा पाऊस लांबणार

Last Updated: Oct 11 2019 1:20AM
Responsive image

Responsive image

पुणे : प्रतिनिधी
 नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) राज्यातून लवकर परतण्याची चिन्हे नाहीत. मान्सून यंदा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत राज्यात मुक्‍कामी राहण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या शेवटीच मान्सून संपूर्ण राज्यातून परतेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पाण्यातच जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मान्सूनने राज्याच्या बहुतांश भागांना यंदा चांगलेच झोडपून काढले आहे. सद्यःस्थितीत परतीचा पाऊसही नागरिकांची सत्वपरीक्षाच पाहात आहे. जुलै ते सप्टेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबई व विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. जवळपास निम्मा ऑक्टोबर महिना उलटला तरीदेखील मान्सून पाठ सोडत नसल्याचेच दिसून येते.
आयएमडी मुंबईने राज्यात मान्सून रेंगाळण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयएमडीच्या वेबसाईटवर ऑक्टोबर अखेरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकणात तुरळक ठिकाणी दमदार पाऊस सुरूच राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात असणारा समांतर कमी दाबाचा पट्टा, राज्यातील द्रोणीय स्थिती, चक्राकार वारे, आदी कारणे पाऊस दमदारपणे कोसळण्यास अनुकूल असतात. यंदाच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील ही सर्व स्थिती कायम आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत असल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

1961 नंतर सर्वाधिक लांबलेला मान्सून हंगाम

राजस्थानच्या निम्म्या भागातून मान्सून गुरुवारी (दि. 10) माघारी परतल्याचे हवामान खात्याने गुरुवारी जाहीर केले. सर्वसाधारणपणे 1 सप्टेंबर रोजी मान्सून राजस्थानातून परततो. यंदा मात्र तब्बल 40 दिवस उशिराने मान्सून तेथून परतल्याचे दिसून आले. यंदाचा हंगाम 1 ऑक्टोबर 1961 नंतरचा सर्वाधिक लांबलेला  हंगाम आहे. दरम्यान, राजस्थानच्या बहुतांश भागांसह पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली येथूनही मान्सून माघारी परतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. राज्यातून तो कधी परतेल, याबाबतची नेमकी तारीख आयएमडीकडून सांगण्यात आलेली नाही. परंतु, 26 ते 29 ऑक्टोबरदरम्यान मान्सून राज्याच्या बहुतांश भागांतून परतेल, असे संकेत मिळू लागले आहेत.स्‍ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा : धनंजय मुंडेंची मागणी


अमेरिकेमध्ये जाण्याचा ३२५ भारतीयांचा प्रयत्न फसला; मेक्सिकोतून पाठवले परत 


कोल्हापूर : ऋतुराज पाटलांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठीतून संवाद  


रंजन गोगोई यांच्‍या निवृत्तीनंतर मराठी माणूस होणार सरन्यायाधीश?


पीएमसी बँक खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही


KBC 11: ' १५ वर्षांची होते, तेव्हा ८ लोकांनी केला बलात्‍कार' ​​​​​​​


स्पृहाच्या या लुकमधील 'विक्की वेलिंगकर'चे नवे पोस्टर 


'या' हॉलिवूड अभिनेत्रीने ऋतिकचा उचलला नाही फोन 


कोल्‍हापूर : बनावट नोटांची छपाई; तिघांना अटक 


प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडीसमोर हजर