Fri, Sep 20, 2019 07:42होमपेज › Pune › १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवारी ऑनलाईन जाहीर होणार 

१२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवारी ऑनलाईन जाहीर होणार 

Published On: Aug 22 2019 8:26PM | Last Updated: Aug 22 2019 8:26PM
पुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 17 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या शुक्रवार दि. 23 रोजी जाहीर होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

बारावी नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic. in या वेबसाईटवरवर दुपारी 01.00 नंतर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. तसेच निकालाची ऑनलाईन प्रींटही काढता येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवार दि.26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत, गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत घ्यायची आहे. त्यांनी दि.26 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत, गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील. जुलै-ऑगस्ट 2019 च्या परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागतील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असे आवाहन डॉ.भोसले यांनी केले आहे.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex