Wed, Jul 17, 2019 16:24होमपेज › Pune › आगी उपनगरात तर बंब शहरात

आगी उपनगरात तर बंब शहरात

Published On: Apr 27 2018 1:06AM | Last Updated: Apr 27 2018 12:05AMपुणे : भाग्यश्री जाधव 

शहरातील लोकसंख्येच्या निकषानुसार किमान 36 अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असतना अवघ्या 13 केंद्रादवर भार पडत आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची सगळ्यात मोठी जबाबदारी निभावणार्‍या अग्निशमन विभागाला तुटपुंज्या सुविधांच्या साहाय्याने काम करावे लागत आहे. पुणे शहराची लोकसंख्या, इमारतींची संख्या, शहराचे आकारमान आणि येथील अपघाताच्या शक्यता लक्षात घेता शहराला देण्यात येणारी अग्निशमन दलाची सुविधा अपुरी आहे. सध्या पुणे शहराची लोकसंख्या 40 लाखाच्या आसपासआहे. या लोकसंख्येच्या तुलनेत शहरता केवळ 13 अग्निशमन केंद्रे असून केवळ 490 कर्मचारी आहेत.  या तुटपुंज्या केंद्रांवरच सर्व भार सोसावा लागत आहे. शहरातील समस्येचे आव्हन पेलण्यास ही अग्निशमन सेवा असमर्थ ठरत आहे तर नव्याने समाविष्ट केलेल्या गावांचा प्रश्‍न कसा सोडविणार हा आणखी गंभीर प्रश्‍न आहे. 

उपनगरात दुर्घटना घडल्यास नागरिकांना शहरातील  अग्निशमन केंद्राच्या पथकाची वाट पहावी लागते. बंब पोहचेपर्यंत आगी रौद्र रूप धारण करून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर पर्याय म्हणजे उपनगरातील अग्निशमन केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे; मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याकडे कायमच दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

अग्निशमन दलाच्या अत्याधुनिकरणाबाबत महापालिकेतील सत्ताधारी वा विरोधी पक्षांनी कधीच गांभीर्य दाखवलेले नाही. 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान शहरात विविध ठिकाणी 730 आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी मार्केटयार्ड येथे लागलेली आग, त्यापूर्वी गुलटेकडी येथील गोल्डन बेकरीची आग अशा अनेक घटनांच्याप्रसंगी अग्निशमन दलातील साधनसामग्रीचा अभाव दिसून आला आहे

अपुरे मनुष्यबळ

अग्निशमन केंद्राची सेवा अद्ययावत करण्यासाठी 1600 हून अधिक कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. मात्र सध्या 12 अधिकारी, 4 वरिष्ठ  अग्निशामक, चालक व कर्मचारी धरून 490 एवढ्या मनुष्यबळाच्या खांद्यावर शहरांचा भार आहे. नव्याने कर्मचारी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मात्र कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.

अग्निशमन केंद्रांची आवश्यकता

समाविष्ट गावांचा झपाट्याने विकास होत असल्याने नर्‍हे आंबेगाव, उंड्री, केशवनगर, कात्रज, वारजे, हडपसर, कोरेगाव पार्क, सिंहगड रोड, येरवडा, विश्रांतवाडी या भागात अग्निशमन केंद्रे उभारण्याची गरज आहे.