Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Pune › आठ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणार्‍याचा जामीन फेटाळला 

आठ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणार्‍याचा जामीन फेटाळला 

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी 

चॉकलेटचे आमिष दाखवून आठ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणात एकाचा जामीन विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी बुधवारी फेटाळून लावला. मुस्तफा अब्दुल रज्जाक मुजावर (19, रा. कोंढवा खुर्द) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. याप्रकरणात आश्‍चर्याची बाब म्हणजे बालिकेवर बारा वर्ष, अकरा वर्ष, दहा वर्ष आणि साडेसहा वर्षाच्या मुलावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्यात पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

ऑगस्ट 2017 ते 17 डिसेंबर 2017 या कालावधीत मुजावरने त्यांच्या इतर अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने  नवीन बांधकामाच्या साईटवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुजावरला 21 डिसेंबर रोजी अटक होऊन न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, याप्रकरणांमध्ये त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्याला अतिरिक्‍त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला.

मुजावरला जामीन दिल्यास तो पीडिता आणि साक्षीदार यांच्यावर दबाव आणून  पुन्हा अत्याचार करण्याची शक्यता आहे.  गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून दोषारोपपत्रही दाखल होणे बाकी आहे. त्यामुळे मुजावरचा जामीन फेटाळण्याची मागणी बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्‍तीवाद ग्राह्य धरून मुजावर याचा जामीन फेटाळला आहे.