पुणे : प्रतिनिधी
जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी(दि. 17) अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुरंदरचा पूर्व भाग तसेच भोर तालुक्याच्या पश्चिम भागात वादळी पावसासह गारपीट झाली. या अवकाळीने डाळिंब बागांसह सर्वच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने पुन्हा एकवेळ शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
भोर तालुक्यातील पश्चिम पट्टा, कर्नावड आदी भागांत गारपीट झाली. या गारपीट व वादळी वार्याने पिके झोपली. पुरंदर तालुक्याच्या पारगाव मेमाणे भागात सलग तीन तास पाऊस झाला. यामध्ये तब्बल एक तास गारपीट झाली. या मुळे आंबा, डाळिंब बागा, कापणीला आलेली ज्वारी, अंजीर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Tags : Pimpri, The, rain, bigger