Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Pune › विजयस्तंभाकडे येणार्‍यांची माहिती पोलिसांनी घेतली

विजयस्तंभाकडे येणार्‍यांची माहिती पोलिसांनी घेतली

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 12:34AMकोरेगाव भीमा : प्रतिनिधी

दि. 1 जानेवारीला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पेरणे फाटा परिसरात असलेल्या विजयस्तंभ परिसरात लोणीकंद पोलिसांच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे या ठिकाणी येणार्‍या प्रत्येक नागरिकांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत होती.

येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी व आपापल्या गावामध्ये भीमज्योत घेऊन जाण्यासाठी रात्री 12 पासूनच भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शिरूर-हवेली पाठोपाठ संपूर्ण पुणे जिल्ह्यातून; तसेच अहमदनगर, वाई, सातारा या ठिकाणांहून देखील असंख्य भीमज्योती या ठिकाणी प्रज्वलित करण्यात येत होत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक नागरिकांची माहिती व मोबाईल नंबर या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत नोंदवून मगच प्रत्येकाला आतमध्ये सोडण्यात येत होते.तसेच भीम सैनिकांच्या वतीने पारंपरिक वाद्यांच्या व शांततेच्या मार्गाने या ठिकाणी येऊन मानवंदना देत होते. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, पोलिसांवरील ताण काही अंशी कमी झाला होता. 


Tags : Pune, police, took, information, about,  people, coming,  Vijay Stambh