Sun, Nov 17, 2019 07:20होमपेज › Pune › शाळा परिसरात दुचाकींचा गर्दी

पुणे :  स्कूलबस बंद आंदोलनामुळे पालकांची दैना 

Published On: Jul 20 2018 11:53AM | Last Updated: Jul 20 2018 11:53AMपुणे : प्रतिनिधी

शहरात ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट संघटनेच्यावतीने चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनात विविध संघटना, स्कूल बस चालकांनी सहभाग घेतला आहे. परिणामी शालेय विद्यार्थी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सोडविण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली. रिक्षा आणि दुचाकी प्रवास विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

स्कूलबस बंद असल्याने शिवाजीनगर, स्वारगेट, लक्ष्मी रस्त्यावरील शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत सोडले असल्याचे चित्र दिसून आले.  त्यात सकाळपासून संततधार रिमझिम पावसामुळे शाळेत पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विविध भागातील पालकांना शाळेत विद्यार्थी पोहचविण्यासाठी उशीर झाला होता.

 सकाळच्या सत्रातील शाळा असल्याने विद्यार्थी वेळेवर शाळेत सोडण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागत असल्याचे दिसून आले. स्कूलबस उपलब्ध नसल्याने काही शाळांनी विद्यार्थ्यांना थोडी उशिरा येण्याची सूट दिली आहे. एकंदरीत स्कूलबस संघटना चक्का जाम आंदोलनात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थी वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला आहे.