Thu, Jun 27, 2019 15:43होमपेज › Pune › स्वच्छता सेवेच्या त्रुटीमुळे शहर पिछाडीवर 

स्वच्छता सेवेच्या त्रुटीमुळे शहर पिछाडीवर 

Published On: Jun 25 2018 1:51AM | Last Updated: Jun 25 2018 12:58AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहर सर्वेक्षणात (स्पर्धा) सर्वाधिक गुण केंद्रीय पथकाने केलेल्या थेट पाहणीस मिळाल्याने पिंपरी-चिंचवड शहराचे स्थान 50 मध्ये येऊ शकले आहे. त्या गटात 1 हजार 200 पैकी 1 हजार 111 गुण इतके गुण मिळाले आहेत. नागरिकांचा प्रतिसादासाठी 1 हजार 400 पैकी 1 हजार 82 गुण आहेत. मात्र, पालिकेतर्फे पुरविण्यात येणार्‍या सेवेत 1 हजार 400 पैकी केवळ 743  गुण मिळाल्याने शहाराचा स्थान पुण्याचा तुलनेत खूपच घसरले आहे. 

सर्वेक्षणात पहिल्या वर्षी म्हणजे 2016 ला देशातील 73 मोठ्या शहरात पिंपरी-चिंचवडचा नववा क्रमांक आला होता. दुसर्‍या वर्षी 2017 ला 443 शहराच्या सर्वेक्षणात हा क्रमांक घसरून थेट 72 पोहचला. यंदा 2018 मध्ये 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या 100 शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचे स्थान 43 क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुुलनेत 29 क्रमांकावर स्थान उंचावले आहे. ही शहरासाठी काहीशी समाधानकारक बाब आहे. मात्र, शेजारच्या पुणे शहर दहाव्या क्रमांकावर आहे. त्यांच्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराचे स्थान 43 व्या स्थानावर आहे. ही बाब शहराच्या दृष्टीने नक्कीच कौतुकास्पद नाही.  

यंदा फेबु्रवारी महिन्यात शहरात हे सर्वेक्षण झाले. त्यासाठी दिल्लीतील 3 सदस्यांची समिती शहरात आली होती. त्यांनी शहरातील स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृह, झोपडपट्टया, बाजारपेठ, मंडई, मोशी कचरा डेपो, घनकचरा व्यवस्थापन आदींची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, पालिकेत घनकचरा व्यवस्थापनाच्या नोंदी तपासल्या. स्वच्छतेबाबत नागरिकांचा तक्रारीवर पालिकेतर्फे होणारी कारवाईचा फिडबॅक तपासला.

समितीने केलेल्या थेट पाहणीस सर्वांधिक 1 हजार 111 गुण मिळाले. या गटात पुण्यास 1 हजार 1 हजार 159 म्हणजे केवळ 41 गुण कमी मिळाले आहेत. नागरिकांचा प्रतिसाद आणि स्वच्छता अ‍ॅप गटात 1 हजार 400 पैकी 1 हजार 82 गुण शहराला मिळाले आहेत. तर, पुण्याने 1 हजार 121 गुण खेचले आहेत. 

या गुणांमध्ये दोन्ही शहरात केवळ 39 गुणांनी पिंपरी-चिंचवड मागे आहे. 

पालिकेच्या वतीने पुरविण्यात येणार्‍या सेवामध्ये शहर खूपच मागे पडले आहे. घरोघरचा कचरा संकलित करणे, गटार व रस्ते स्वच्छता, कचर्यांची मोशी डेपोपर्यंत वाहतूक करणे, डेपोत कचरा विलीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे या कामांचा ठेक्याची कागदपत्रे तपासण्यात आली. त्यामध्ये पथकास काही त्रुटी आढळल्या. या गटात 1 हजार 400 पैकी केवळ 743 गुणांपर्यत शहर मजल मारू शकले. पुणे शहराने याच गटात सर्वांधिक 1 हजार 191 गुण प्राप्त करीत 100 शहरात दहावे स्थान पटकावले आहे.