Fri, May 29, 2020 00:20होमपेज › Pune › गुणवंतांचा टक्‍का वाढला

गुणवंतांचा टक्‍का वाढला

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुणवंत विद्यार्थ्यांचा टक्का वाढलेला दिसून येत आहे. विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत 4 लाख 3 हजार 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी 3 लाख 49 हजार 485 असलेली ही संख्या तब्बल 53 हजार 652 ने वाढली आहे. 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही 48 हजार 470 वरून वाढून तब्बल 63 हजार 331 एवढी झाली आहे.  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दि. 1 ते 24 मार्चदरम्यान घेतलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी, 8 जून रोजी मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी जाहीर केला. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्याची तारीख येत्या 2 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. गुणपत्रिकेसोबत कलचाचणीच्या निकालाची प्रतदेखील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.राज्याचा एकूण निकाल गतवर्षीच्या तुलनेत 0.67 ने वाढून 89.41 टक्के इतका आहे. मात्र, यंदा 100 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली असून, 125 झाली आहे. 

गेल्या वर्षी 193 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. नेहमीप्रमाणे यंदा देखील मुलींनीच बाजी मारली असून, मुलींचा एकूण निकाल 91.97 टक्के, तर मुलांचा निकाल 87.27 टक्के आहे. पुणे विभागाचा निकाल 92.8 टक्के आहे. विभागवार निकालात कोकणच (96 टक्के) सरस ठरले आहे, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (85.97)आहे. 33 शाळांचा निकाल हा शून्य टक्के आहे, तर 4 हजार 28 शाळांचा निकाल 100 टक्के आहे. एकूण 57 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये 11 विषयांचा निकाल 100 टक्के आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 86.87 टक्के आहे. 
 
विभागवार निकाल...

पुणे- 92.08, नागपूर- 85.97, औरंगाबाद- 88.81, मुंबई- 90.41, कोल्हापूर-93.88, अमरावती- 86.49, नाशिक- 87.42, लातूर- 86.30, कोकण- 96.00

गेल्या पाच वर्षांचा निकाल -

मार्च 2014 - 88.32, मार्च 2015 - 91.46, मार्च 2016 - 89.56, मार्च 2017 - 88.74, मार्च 2018 - 89.41
विभागवार निकालाची टक्केवारी
...............
 विभागीय मंडळ     नोंदणी झालेले      प्रविष्ट           उत्तीर्ण          टक्केवारी
 1. पुणे         269220    268088     246855              92.08
 2. नागपूर         171364    170314     146418              85.97
 3. औरंगाबाद     189615    188319     167244               88.81
 4. मुंबई         339899    338609      306151              90.41
 5. कोल्हापूर     144149    143823      135018              93.88
 6. अमरावती     171811    170899       147809             86.49
 7. नाशिक         200794    200054       174892             87.42
 8. लातूर         111692    110828        95645              86.30
 9. कोकण         37706        37679             36171                 6.0
..........................................................................................
एकूण         1636250    1628613      1456203          89.41