Thu, Apr 18, 2019 16:23होमपेज › Pune › विमान प्रशासनाकडून काहीच उपाययोजना नाही

केरळहून विमानाने येणार्‍या प्रवाशांत भिती

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

निपाह व्हायरसने केरळमधील कोझिकोडे येथे चांगलेच डोके वर काढले आहे. केरळमध्ये यामुळे भितीचे वातावरण असून, केरळहून विमानाने प्रवास करून पुण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये देखील भितीचे वातावरण आहे. परंतु, या प्रवाशांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ना केरळमधील कोची येथे आरोग्य तपासणी करणण्यात आली, ना पुण्यातील लोहगाव विमानतळावर तपासणी करण्यात आली. ही बाब गंभीर असून, प्रवाशांच्या सुरक्षितेतासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे कोचीहून बुधवारी (दि.23) दुपारी 3.48 वाजताच्या फ्लाईटने पुण्यात आलेल्या बिनोय थोटकाथ या प्रवाशाने ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

‘निपाह व्हायरस’चा सध्या राज्याला तरी काही धोका नसल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगितले जात असले, तरी देखील या व्हायरसची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. केरळहून विमानाने प्रवास करून राज्यात येणार्‍या प्रवाशांकडे विशेष लक्ष देण्याचे विमान प्रशासन आणि आरोग्य विभागाची जबाबदारी असताना दोन्ही विभागांनी लोहगाव विमानतळावर कुठल्याच उपाययोजना सुरू केलेल्या नाहीत. केरळमधून येणार्‍या प्रवाशांच्या माध्यमातून निपाह व्हायरस राज्यात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु याचे सोयरसुतक विमान प्रशासनाला दिसत नाही.