होमपेज › Pune › ऑनलाईन स्मार्टफोन खरेदीत दीडपट वाढ  

ऑनलाईन स्मार्टफोन खरेदीत दीडपट वाढ  

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:34AMपुणे : पुण्यासह संपूर्ण राज्यभरात ऑनलाईन पोर्टलवर स्मार्टफोन खरेदी करणा-या ग्राहकांची संख्या गेल्या आर्थिक वर्षात दीडपटीने वाढली आहे. यात ग्रामीण भागातील ग्राहकांचाही वाटा अधिक असल्याच अ‍ॅमेझॉनच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. 

सर्वोत्तम सिलेक्शन, उत्पादनांची विस्तृत श्रेणी, आकर्षक किंमती आणि विश्‍वासार्ह वितरण सेवा यांच्या जोरावर ऑनलाईन खरेदीत वाढ झाली आहे.  महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी स्मार्टफोन हा मोठ्या जिव्हाळ्याचा विषय असून स्मार्टफोन्सच्या ऑनलाइन खरेदीत अनेक पर्याय त्यांना उपलब्ध असतात. म्हणूनच जळगाव, सातारा, धुळे, अकोला, बुलढाणा आणि वर्धा अशा तुलनेने छोट्या शहरांतूनसुद्धा या उत्पादनांना मागणी येत आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक विकल्या गेलेल्या ब्रॅण्ड्समध्ये झियोमी, मोटोरोला, सॅमसंग, वनप्लस, लेनोव्हो ही मॉडेल्स सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे अ‍ॅमेझॉन इंडियाच्या स्मार्टफोन्स विभागाचे वरीष्ठ व्यवस्थापक मनिष थापा यांनी सांगितले. 

आयटी हब असलेल्या पुण्यातही ऑनलाईन स्मार्टफोन खरेदीत दुसरी मोठी बाजारपेठ ठरल्याचेही त्यांनी नमूद केले. पुण्यात तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे. या वर्गातील ग्राहकांची विशिष्ट निवड आणि आवड आहे. ती लक्षात घेऊन येथील वितरण जाळे अधिक वेगाने विस्तारण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. अ‍ॅमेझॉनने राज्यात 14 फुलफिलमेंट सेंटर्स स्थापन केली आहेत. यापैकी दोन सेंटर्स पुण्यात आहेत.विस्तारीकरणाच्या दृष्टीनेही 4 वितरण स्थानके, 62 सर्विस पार्टनर नोड्स आणि 1950 हून अधिक ‘आय हॅव स्पेस’ स्टोअर पार्टनर्स यांच्या साथीने राज्यात वितरणाचे मजबूत जाळे उभारले आहे. या नेटवर्कमुळे या प्रांतातील ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू वेगाने आणि विश्वासार्ह पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. आमच्याकडे स्मार्टफोन्सचा विशाल संग्रह असल्याने प्रत्येक किंमतीच्या गटातील प्रत्येक ग्राहकाची मागणी आमच्या मंचावर पूर्ण होते, असे थापा म्हणाले.

Tags : Pune, online, smartphone, purchase, tremendous, growth