Thu, Aug 22, 2019 13:11होमपेज › Pune › वाहनांची संख्या वाढली.. वेग मंदावला

वाहनांची संख्या वाढली.. वेग मंदावला

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी म्हणून विकसीत होत असलेल्या पुणे शहरातील वाहतुक व्यवस्था कशी कोलमडली आहे, यावर महापालिकेच्या पर्यावरण अहवालातच शिक्का मोर्तब करण्यात आली आहे. एकिकडे वेगाने वाहनांची संख्या वेगाने वाढत असतानाच वाहनांचा वेग मात्र मंदावला असल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यावरण सद्यस्थिती अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार शहरातील वाहनांची गती प्रति तास 30 किलोमीटर अपेक्षित आहे. मात्र रस्त्यांवरील वाहणांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे तो केवळ 18 किलोमीटर प्रतितास इतका नोंदवण्यात आला आहे. त्यात सार्वजनिक वाहतुकीचाही समावेश असून असून सार्वजनिक वाहतुकीच्या 80 टक्के फेर्‍या अपेक्षित असताना त्याचे प्रमाण केवळ 26.87 टक्के इतके अत्यल्प आहे. तर रिक्षासारख्या  सार्वजनिक वाहनांची संख्या गरजेपेक्षा अधिक असून 1 हजार ऐवजी 1890 वाहने सध्या वापरात असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. 

पादचार्‍यांचेही  हालचं 

शहरातील प्रत्येक रस्त्यावर 100 टक्के पादचारी आणि सायकल मार्ग आवश्यक आहे. मात्र, शहरात हे प्रमाण अनुक्रमे 53 आणि 4.8टक्के इतकेच असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे पादचार्‍यांचेही हालच होत असल्याचे समोर आले आहे. 

वाहनांची संख्या वेगात

वाहतुकीचा वेग मंदाविला असताना शहरातील वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. मार्च 2018 पर्यंत शहरातील वाहणांची संख्या 36 लाख 27 हजार 280 इतकी आहे. त्यात दुचाकींची संख्या 27 लाख 3 हजार 147 इतकी तर चारचाकी वाहनांची संख्या 8 लाख 7 हजार 906 व तिनचाकी वाहनांची संख्या 53 हजार 227 इतकी आहे.