होमपेज › Pune › ‘ठंडा ठंडा कूल कूल’

‘ठंडा ठंडा कूल कूल’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

कात्रज येथील राजीवगांधी प्राणी संग्रहालयात प्राण्यांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता हे प्राणी संग्रहालयाला ठंडा ठंडा कूल कूल झाले आहे. असेच म्हणावे लागेल.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सुमारे 63 प्रजातींचे 420 प्राणी आहेत. त्यामध्ये सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी यांचा समावेश होतो. त्यांना पाहण्यासाठी पुण्यासह अन्य भागातील अनेक पर्यटक येत असतात. प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनामार्फत प्राण्यांची देखभाल निगा राखण्याचे काम केले जाते. उन्हाळ्यात तापमान 40 अंश डिगरीच्या वर जाते, तेव्हा संग्रहालयातील वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल, हत्ती यांसारख्या प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे या प्राण्यांच्या रात्रनिवार्‍यामध्ये कुलर आणि फॉगरची व्यवस्था केली असल्याचे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.

यावेळी जाधव म्हणाले, सरपटणार्‍या प्राण्यांसाठी सुध्दा फॉगरची व्यवस्था करण्यात आली आहे. हत्तीला दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाण्याने अंघोळ घालण्यात येते. संग्रहालयातील हरीण वर्गातील तृणभक्षक प्राण्यांच्या खंदकाभोवती थंड पाण्याचे स्प्रिंगल फिरत असतात. त्या स्प्रिंगलमुळे परिसरात हिरवळ कायम राहण्यास मदत होते. तसेच खंदकाभोवतीचे तापमान देखील थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत उद्यानास भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढते. लहान मुलांनाही पाण्यात पहूडलेला वाघ पाहण्याची मजा वाटते.

Tags ; Pune, Pune News, number,  tourists, visiting,  park, increases, during, summer, holidays.


  •