Mon, Jun 17, 2019 14:13होमपेज › Pune › ह्रदयरोग बनतोय जायंट किलर

ह्रदयरोग बनतोय जायंट किलर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

बदललेली जीवनशैली, आहार-विहार, झोपेच्या वेळा, सवयी, चंगळवाद तसेच अंगमेहनतीचे व व्यायामाचे घटलेले प्रमाण यामुळे ह्रदयरोग आणि रक्‍तभिसरणाविषयीचे आजारांची संख्या प्रचंड वाढली आहे. या आजारांमुळे राज्यात प्रत्येक वर्षी होणार्‍या एकूण मृत्यूंच्या 30 ते35 टक्के मृत्यू हे ह्रदयरेाग आणि रक्‍तभिसरण प्रक्रियेच्या आजारांमुळे झाले आहेत. यावरून एकीकडे जीवशैलीविषयक आजारांत वाढ होत असतानात मात्र दुसरीकडे संसर्गजन्य आजारांवर उपलब्ध झालेल्या वैद्यकीय सोयीसुविधांमुळे त्या आजारांच्या मृत्यूमुळे घट झाल्याचे दिसून येत आहे. 

राज्यात दरवर्षी सरासरी सहा लाख नागरिकांचा मृत्यू होतो. राज्याच्या मृत्यू नोंदणी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये राज्यात 6 लाख 71 हजार 243 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 34 टक्के मृत्यूंचे म्हणजेच 2 लाख 32 हजार नागरिकांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला त्याचे वैद्यकीय कारण स्पष्ठ करण्यात आलेले आहे. तर उरलेल्या 4 लाख 38 हजार मृत्यू कशामुळे झाला त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे कशामुळे झाला याची माहिती उपलब्ध नाही. 

2 लाख 32 हजारांपैकी 79 हजार वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध असलेल्या नागरिकांपैकी 34 टक्के (79 हजार) नागरिकांचा मृत्यू हा ह्रदयरोग आणि रक्‍तभिसरणाच्या आजारांमुळे झाला आहे. यामध्ये 49 हजार पुरूष तर 29 हजार महिलांचा समावेश आहे. यावरून ह्रदयरोग हा राज्यात मृत्यूचे प्रमुख कारण बनत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून आता खान-पान पदार्थ व सवयी बदलणे, व्यायाम करणे आवश्यक बनले आहे. 

राज्यातील मृत्यू नोंदणी विभागाकडे 2003 ते 2015 पर्यंतची मृत्यूची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार 2003 पासून ह्रदयरोगाने मृत्यू होणार्‍या नागरिकांची संख्या वाढलेली आहे. 2003 मध्ये ही संख्या ही एकूण मृत्यूपैकी 27 टक्के होती. ती 2015 मध्ये 34 टक्यांवर जाउन पोचली आहे. तर श्‍वसन, चेतासंसंस्था व संसर्गजन्य आजारांमध्ये घट झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.  

काय आहेत ह्रदयरोग व रक्‍तभिसरणाचे आजार 

ह्रदयरोग आणि रक्‍तभिसरण संस्थेच्या आजारामध्ेय धमन्यांचे आजार, चरबीमुळे रक्‍तप्रवाह अडवल्यामुळे होणारे आजार (एथ्रोस्क्‍वेलेरोसिस), ह्रदयविकाराचा धक्‍का, उच्च रक्‍तदाब, ह्रदय निकामी होणे, एओर्टा डिसेक्शन, ह्रदय निकामी होण्याचा आजार (कार्डिओमायोपॅथी) व इतर किरकोळ आजारांचा समावेश होतो.

 

Tags : pune, pune news, Cardiovascular disease, patient


  •