Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Pune › नोटाबंदीने गमावले ते ‘रेरा’ने कमावले

नोटाबंदीने गमावले ते ‘रेरा’ने कमावले

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी 

नोटाबंदी, जीएसटी आणि रेरामुळे बांधकाम व्यवसाय घाट्यात येण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात रेराची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून दस्त नोंदणी आणि शासनाला मिळमार्‍या महसुलात घसघशीत वाढ होऊ लागली आहे. जीएसटी आणि ‘रेरा’ कायद्यामुळे खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता आली असून, परिणामी घरखरेदी करणार्‍यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून येत आहे. 

2015-16 या आर्थिक वर्षात दोन कोटी 30 लाख 8 हजार 809 दस्त नोंदणी झाली.  त्यातून 21 हजार 767 कोटी 1 लाख रुपये शासनाला मिळाले. मात्र, नोटाबंदीचा फटका बसल्याने त्यात घट होऊन 2016-17 या आर्थिक वर्षात 2 कोटी 12 लाख 2 हजार 591 एवढीच दस्त नोंदणी झाली. त्यातीन 21 हजार 52 कोटी 65 लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला. मात्र, 2015-16 च्या तुलनेत दस्त नोंदणीत 2016-17 मध्ये 1 लाख 86 हजार 218 दस्त नोंणीत तर, महसूलात 714 कोटी 14 लाख रुपयांची घट झाली झाली. नोटाबंदीच्या निर्णयाचा व्यावसायिकांसह शासनालाही मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे दिसून येत आहे.

एप्रिल 2017 ते 15 जानेवारी 2018 या साडेनऊ महिन्यात 1 कोटी 60 लाख 9 हजार 563 दस्त नोंदणी झाली असून त्यातून 19 हजार 386 कोटी 5 लाख रुपयांचा महसूल सासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या नोंदणींचा पल्ला गाठण्यासाठी 5 लाख 13 हजार 28 दस्त नोंदणी कमी आहेत. तसेच 1166 कोटी 6 लाख रुपयांचा महसूल कमी आहे. पुढील अडिच महिन्यात उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. जीएसटी आणि रेरा कायद्यामुळे बांधकाम व्यवसायिक अडचणीत आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांना आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे बदल उपयुक्‍त ठरत असल्याचे खरेदी-विक्रीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.