Tue, Nov 20, 2018 21:08होमपेज › Pune › नवरा-बायकोच्या आत्महत्येचे गूढ उलगडले

नवरा-बायकोच्या आत्महत्येचे गूढ उलगडले

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:17PMपिंपरी : प्रतिनिधी 

चर्‍होली येथील नवरा-बायकोने आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. या आत्महत्येचे गूढ उलगडले असून, याप्रकरणी एका ठेकेदारास अटक करण्यात आली आहे. 28 जून रोजी नवरा-बायकोने राहत्या घरात गळफास लावून घेतला होता.

भरत हनुमान काळे (29, रा. दाभाडे वस्ती, चर्‍होली) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. उत्तम तुकाराम सूर्यवंशी (वय 33) आणि मुक्‍ता उत्तम सूर्यवंशी (वय 31) या नवरा- बायकोने आत्महत्या केली होती. मुक्ता यांच्या भावाने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत काळे हा महापालिकेचा सब कॉन्ट्रॅक्टर आहे. उत्तम सूर्यवंशी त्याच्या साईटवर इलेक्ट्रिशियन म्हणून काम पाहात होते. मजुरीचे पैसे देण्याच्या कारणातून त्यांच्यात वाद होता. या सर्व त्रासाला कंटाळून नवरा-बायकोने 28 जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास दिघी पोलिस करीत आहेत.