Thu, Jun 27, 2019 01:34होमपेज › Pune › पिंपरी चिंचवडमध्ये संस्थाचालकावर विनयभंगाचा गुन्हा 

पिंपरी चिंचवडमध्ये संस्थाचालकावर विनयभंगाचा गुन्हा 

Published On: Jul 31 2018 10:18AM | Last Updated: Jul 31 2018 10:18AMपिंपरी : प्रतिनिधी 

महिलेला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी 'एसएनबीपी' स्कुलच्या संस्थाचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २० जुलै रोजी ही घटना चिंचवड शहरात घडली होती. 

दशरथ भोसले (रा.येरवडा) या संस्थाचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला शाळेतील अकाऊंट विभागात काम करते. २० जुलै रोजी भोसलेने केबिनमध्ये कोणी नसताना महिलेला कामाच्या बहाण्याने केबिनमध्ये बोलवले. अकाऊंटचे काम करत असताना त्याने महिलेशी अश्लील चाळे करण्यात सुरुवात केली.

महिलेने हा प्रकार तिच्या घरी सांगितल्यानंतर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.