Sun, Jul 21, 2019 10:03होमपेज › Pune › जिल्ह्यात दूध दरवाढ आंदोलनाची धग कायम

जिल्ह्यात दूध दरवाढ आंदोलनाची धग कायम

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 18 2018 1:25AMपुणे : पुढारी वृत्तसंकलन

सोमवारपासून (दि. 16) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला 5 रुपये अनुदान देण्यासाठी दूधबंद आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी दुसर्‍या दिवशी या आंदोलनाची धग कायम होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दूध उत्पादकांनी दूध संकलन केंद्राला दूध घातले नाही. त्यांनी गरजूंना वाटप केले तर काही ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवत रस्त्यावर दूध ओतले.

गाईला दुधाने अंघोळ

भवानीनगर : बारामती-इंदापूर रस्त्यावरील जाचकवस्ती (ता. इंदापूर) येथे गाईला दुधाने अंघोळ घालून व रस्त्यावर दूध ओतून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दूध दर वाढीसाठी मंगळवारी (दि. 17) आंदोलन केले. यावेळी सणसर सोसायटीचे संचालक विक्रम निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम निंबाळकर, सावता परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे आदी उपस्थित होते.

दूध आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशीही केडगाव आणि परिसरात सरकारचा निषेध करण्यात आला. पुणे-सोलापूर महामार्गावर चौफुला येथे झाडांना दूध घालून सरकारचा निषेध करण्यात आला.बारामतीत सहकारी संघांबरोबरच खासगी संघांकडेही नियमाप्रमाणे दूध संकलन झाले. त्यामुळे दूध दर आंदोलनाचा विषय थांबल्यातच जमा झाला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी बारामती तालुक्यात चांगला प्रभाव आढळला होता.  

डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतण्याऐवजी नागरिकांना मोफत वाटून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.  माळेगाव परिसरातील गोरगरीब महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना दूधाचे वाटप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  पदाधिकारी व शेतकर्‍यांनी दुधाची नासाडी टाळत  गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत शासनाचा निषेध केला आहे.   भोर तालुक्यातील दुध उत्पादन शेतकर्‍यांनी भोरमध्ये रस्त्यांवर दुध ओतून शासनाचा निषेध केला