होमपेज › Pune › पुणे : फळ आणि भाजीपाला बाजार होणार सुरू 

पुणे : फळ आणि भाजीपाला बाजार होणार सुरू 

Last Updated: May 28 2020 11:06AM

पुणे मार्केट यार्ड आणि प्रशासक बी. जी. देशमुखपुणे : पुढारी वृत्तसेवा 

मार्केट यार्डातील मुख्य फळ आणि भाजीपाला बाजार सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. फळ आणि भाजीपाला पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात व्यापारी व हमाल यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली आहे. तसेच मार्केट यार्डात गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे मार्केट यार्डातील मुख्य फळ आणि भाजीपाला बाजार होणारी गर्दी टाळण्यासाठी दिवसाआड पद्धतीने फळे भाजीपाला उपलब्ध करून देण्यावर एकमत झाले असून मार्केट सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे. 

पुण्यात कोरोनाचे अकरा बळी

तसेच कोरोनाचा कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरणे बंधनकारक असेल. त्याचबरोबर मार्केट सुरू करण्याआधी संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण केला जात आहे. थर्मल गनने तापमान नोंदवून परवानाधारकांना आत प्रवेश दिला जाईल, अशा उपाययोजना करणार असल्याचेही मार्केटयार्ड प्रशासनाने सांगितले आहे. 

विकास प्रकल्पांना कोरोनोची ‘अर्थ’बाधा

मार्केट यार्ड सुरू करण्याच्या प्रस्तावावर अडते असोसिएशन, टेंम्पो चालक संघटना, कामगार संघटना आणि इतर सदस्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल. तसेच यात काही गोष्टींवर पुन्हा चर्चा करण्यासाठी २८ तारखेला बैठक होणार आहे. या बैठकीत कोणत्या तारखेला आणि कशा पद्धतीने मार्केट सुरू करायचे याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. 
- बी. जी. देशमुख 
प्रशासक, पुणे मार्केट यार्ड