Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Pune › स्किमर टोळीचा मुख्य सूत्रधार अटक

स्किमर टोळीचा मुख्य सूत्रधार अटक

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील सुरक्षा रक्षक नसणार्‍या एटीएम मशिनमध्ये माहिती चोरणारे स्किमर लावून त्याद्वारे पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे कार्डची गोपनीय माहिती चोरणार्‍या टोळीतील मुख्य सूत्रधाराला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, हा सूत्रधार केवळ पाचवी पास आहे. टोळीने शहरातील काही एटीएम मशिनमध्ये हे स्किमवर बसवून बनावट एटीएम कार्ड तयार केले होते. यासीर अब्दुल सय्यद (वय 36, रा. मिरा रोड, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. नागरिकांच्या एटीएम व डेबिट कार्डद्वारे परस्पर इतर शहरांमध्ये पैसे काढून घेण्यात येत असल्याचे प्रकार समोर आला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार आली होती. त्याचा तपास करताना पोलिसांनी एका नायजेरियनसह चौघांना पकडेल होते. त्यानंतर मात्र, या टोळीकडून धक्कादायक माहिती समोर 
आली होती. पोलिसही याप्रकरणानंतर चक्रावून गेले होते. 

सायबर गुन्ह्यामधील ही नवीन पद्धत समोर आली होती. या टोळीने शहरातील सुरक्षा रक्षक नसणारे तसेच काही हॉटेल्स, मॉल्स, पेट्रोल पंप भागातील एटीएम मशिनमध्ये ‘स्किमर’ हे माहिती चोरणारे यंत्र बसविले होते. नागरिक पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर एटीएम मशिनमध्ये आपले कार्ड टाकून पैसे काढत. पण, त्याचवेळी हे स्किमर त्या नागरिकांच्या कार्डची माहिती चोरत असे. त्यानंतर ही टोळी काही दिवसांनी हे स्किमर काढून घेत. त्यातून चोरलेल्या माहितीच्या आधारे बनावट एटीएम कार्ड तयार करत. या कार्डद्वारे इतर शहरांमध्ये बसून नागरिकांच्या खात्यातून पैसे काढत होते. दरम्यान अशाच प्रकारे डेबिट आणि क्रेडिट कार्ड क्लोनिंग करून पुणे, मुंबई, कर्नाटक, तमिळनाडूसह विविध राज्यातील नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

या गुन्ह्यात सायबर सेलच्या पोलिसांनी चौघांना ऑक्टोंबर 2017 मध्ये अटक केली होती. परंतु, या टोळीचे म्होरके पसार होते. यातील रोहित नायरला एप्रिल महिन्यात पकडले. विशेष म्हणजे, त्याला फेसबुकवर वॉच ठेवून पकडण्यात आले होते. परंतु, मुख्य सूत्रधार यासीर सय्यद पसार होता. पोलिसांना त्याची माहिती मिळाली. त्यानुसार, आर्थिक व सायबर सेलचे उपायुक्क्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मनिषा झेंडे, उपनिरीक्षक प्रविण स्वामी व त्यांचे पथकाने मुंबईतून अटक केली. 

पाचवी पास आहे मुख्य सूत्रधार

यासीर सय्यद याचे केवळ पाचवीपयर्र्ंत शिक्षण झाले आहे. मात्र, तो हँकिंगमध्ये मास्टर माईंड आहे. त्याचा कुर्ला येथे एक कॅफे होता. त्यानंतर तो दिल्लीतील एका सेंटरमध्ये काम करू लागला. त्यातून त्याने स्किमरचे गुन्हे सुरू केले. दरम्यान टोळीने शहरातल्या अकरा ठिकाणच्या एटीएम मशिनमध्ये हे स्किमर बसविले होते. त्यातून नागरिकांच्या कार्डची माहिती गोळा केली. एकूण 52 नागरिकांचे बनावट कार्ड तयार केले. त्याद्वारे या टोळीने वेगवेगळ्या शहरातून 22 लाख रुपये काढले होते.