Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Pune › ‘गॅस एजन्सी’कडून होणारी लूट थांबली

‘गॅस एजन्सी’कडून होणारी लूट थांबली

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:55PM

बुकमार्क करा
वाघोली : वार्ताहर

वाघोली येथे गॅस एजन्सीकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याचे वृत्त ‘दैनिक पुढारी’ने 9 जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच वाघोलीतील गॅस एजन्सीजधारक खडबडून जागे झाले आणि सिलेंडरची योग्य किंमत आकारात लुट थांबवल्यामुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त केली जात आहे.

वाघोली येथील गॅस एजन्सीकडून ग्राहकांना सिलेंडर मागे आठ ते अठरा रुपये जास्तीचे आकारले जात होते. अत्यावश्यक गरज म्हणून ग्राहकही निमूटपणे सहन करतांना दिसून येत होते. सिलेंडरची किंमत 732 रुपये असल्यामुळे बहुतांश ग्राहकांकडे दोन रुपये सुट्टे नसल्यामुळे त्यांची अडवणूक व अज्ञानाचा फायदा घेत. एजन्सीजकडून लुट चालू होते याबाबत दैनिक पुढारीने ‘गॅस एजन्सीकडून ग्राहकांची लुट’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. 

पुढारीमध्ये बातमी प्रकाशित होताच एजन्सीधारक खडबडून जागे झाले आणि ग्राहकांना योग्य किंमत आकारून होणारी लुट थांबविण्यात आली. एव्हढेच नव्हे तर ज्या ग्राहकांकडे दोन रुपये सुट्टे नसतील अशा ग्राहकांना दोन रुपयाची सक्ती देखील करण्यात आली नाही.