Thu, Nov 15, 2018 09:42होमपेज › Pune › बैलगाडा मालकांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी राज्य सरकारतर्फे  वकील

बैलगाडा मालकांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी राज्य सरकारतर्फे  वकील

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:20AMपिंपरी : प्रतिनिधी

बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. 23 मार्च रोजी सभागृहात ‘ट्रान्स्फर्म अ‍ॅप्लिकेशन’साठीच्या शासकीय कामासाठी राज्य सरकारतर्फे बैलगाडा मालकांची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील अ‍ॅड. शिरीष देशपांडे आणि अ‍ॅड. राकेश द्विवेदी यांची नेमणूक करण्यात आली आहे. आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा मालकांची बाजू मांडण्यासाठी वकिलांची नेमणूक करण्याच्या मागणीसाठी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. 

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने कायदा केला आहे. मात्र, ’पेटा’ संस्था त्यामध्ये खोडा घालत आहे, असा आरोप बैलगाडा मालकांचा आहे.बैलगाडा शर्यतीचा प्रश्न न्यायालयात सुरू आहे. 23 मार्च रोजी सभागृहात ‘ट्रान्स्फर्म अ‍ॅप्लिकेशन’साठीच्या शासकीय कामासाठी राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. शिरीष देशपांडे आणि अ‍ॅड. राकेश द्विवेदी यांची नेमणूक करण्याची मागणी आ. लांडगे यांनी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभागाचे मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली होती.

या मागणीला मंत्री जाणकारांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन राज्य सरकारतर्फे न्यायालयात बैलगाडा मालकांची बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. शिरीष देशपांडे आणि अ‍ॅड. राकेश द्विवेदी यांची नेमणूक करण्यात आली आहे. आ. लांडगे म्हणाले की, सुमारे 2008 पासून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी लढा सुरू आहे. भाजप सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत कायदा तयार केला. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. भाजप सरकारमधील विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांनी पाठिंबा देऊन संबंधित विधेयक मंजूर केले. तसेच, न्यायालयीन लढाईसाठी राज्य सरकारने स्वखर्चातून वकिलांची नेमणूक केली आहे.

 

Tags : Pimpri, Pimpri news, bullock carts, owners, government, lawyer,