Tue, Jul 23, 2019 10:31होमपेज › Pune › नव्या सप्ताहाच्या प्रारंभी निर्देशांकांत २९४ ने वाढ 

नव्या सप्ताहाच्या प्रारंभी निर्देशांकांत २९४ ने वाढ 

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 11:25PMपुणे : प्रतिनिधी

सोमवारी सुरु झालेल्या नव्या सप्ताहाच्या प्रारंभीच्या सत्रातच भारतीय शेअर बाजारावर खूपच अनुकूल स्वरुपाचे वातावरण निर्माण झालेले पहावयास मिळाले.  जागतिक पातळीवरुन चांगला पाठिंबा लाभल्याने मुंबई शेअर निर्देशांकात या सत्रात तब्बल 294.71 अंशांची तर निफ्टीमध्ये 84.40  अंशांची सुधारणा झालेली पहावयास मिळाली. त्यामुळे प्रमुख निर्देशांकात चांगली वाढ झाली. यामध्ये बँकिंग कंपन्या अनुकूल होत्या. ओएनजीसी, टाटा स्टील यांच्यातही चांगली वाढ झाली. मात्र स्टेट बँक मात्र नरम राहूून खाली घसरलेला होता.

या सत्रामध्ये सकाळी मुंबई शेअर निर्देशांक 34 हजार 203.34 पातळीवर खुला झाला. त्याने दिवसभरात 34 हजार 351.34 अंशांची उच्चांकी पातळी तर 34 हजार 115.12 अंशांची निचांकी पातळी नोंदवलेली होती. दिवसअखेरीस हा निर्देशांक 294.71 अंशांनी वर जाऊन 34 हजार 300.47 अंश पातळीवर बंद झाला.  त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजारावरील निफ्टी निर्देशांकात 84.80  अंशांची वाढ होऊन तो 10  हजार 539.75 अंश पातळीवर बंद झाला. 

या सत्रात अ गटातील 391 कंपन्यांपैकी 306  कंपन्यांची भाव पातळी वरच्या पातळीवर गेली तर उर्वरित 82   कंपन्यांचे भाव  खाली घसरलेले होते. या सत्रात एकूण 2978 कंपन्यांमध्ये व्यवहार होऊन त्यातील 2050 कंपन्यांचे भाव वरच्या पातळीवर गेले तर 764  कंपन्यांची घट  झाली. केवळ 164 कंपन्यांचे भाव त्याच पातळीवर स्थिर राहीलेले होते. तसेच निफ्टीच्या 50 कंपन्यांपैकी 33  कंपन्यांचे भाव वरच्या पातळीवर गेले तर 17 कंपन्यांमध्ये घसरण नोंदवली गेली.

या सत्रामध्ये अ गटातील सर्वाधिक म्हणजे  0.24 टक्के ते 4.22 टक्के इतकी वाढ टाटा स्टील, यस बँक व  डॉ. रेड्डीज लॅब य कंपन्यांमध्ये झाली. तसेच अ गटातील सर्वाधिक 0.08 टक्के ते 2.67  टक्के इतकी घसरण स्टेट बँक, इन्फोसिस व कोल इंडिया  या  कंपन्यांमध्ये झाली. या सत्रातील सर्वाधिक उलाढाल टीसीएस या कंपनीमध्ये झाली. या कंपनीच्या 11 लाख 96 हजार 687 शेअर्समध्ये  358 कोटी 34   लाख रुपयांचे  2  हजार 910 व्यवहार झाले. या कंपनीने या सत्रात 3018   रुपयांची उच्चांकी भाव पातळी तर 2956 रुपयांची निचांकी पातळी नोंदवलेली होती.