होमपेज › Pune › तरुणीची फेसबुकवर बदनामी

तरुणीची फेसबुकवर बदनामी

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 12:23AMपुणे : प्रतिनिधी

प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून तरुणाने उच्चशिक्षित तरुणीचे फेसबुकवर बनावट खाते तयार करून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी स्वर्गेश भरत फुलपगारे (वय 25, रा. धुळे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.  आरोपी स्वर्गेश फुलपगारे आणि तरुणी एकाच महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. त्या वेळी त्याने तरुणीला प्रपोज केले होते; मात्र तिने त्याला नकार दिला होता; त्यामुळे स्वर्गेश याच्या मनात राग होता. दरम्यानच्या कालावधीत तरुणी पुण्यात आली. त्यानंतर आरोपीने फेसबुकवर तिच्या नावाने  बनावट खाते तयार केले.

तसेच, तरुणीच्या मित्र, मैत्रिणी तसेच नातेवाइकांना रिक्वेस्ट पाठविल्या. त्यांना अश्‍लील शब्दांत चॅट केले. तरुणीला मित्र व नातेवाइकांकडून हा प्रकार समजला. त्यानंतर तिने तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी तपास केला असता तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून हा प्रकार केल्याचे समजले. त्यानुसार, पोलिसांनी तपास केला असता आरोपी स्वर्गेश फुलपगारे याने हा प्रकार केल्याचे समोर आले. हा प्रकार जून 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत घडला आहे.