Sun, May 26, 2019 15:39होमपेज › Pune › गुन्हेगारांना पायघड्या, तक्रारदारांना छड्या!

गुन्हेगारांना पायघड्या, तक्रारदारांना छड्या!

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:21AMपुणे : देवेंद्र जैन

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ही पाटी प्रत्येक पोलीस स्थानका मध्ये असते, पण खरोखरच या घोषवाक्याचा आदर पोलीस करतात का? असा प्रश्न प्रत्येक तक्रारदाराला पडतो. जेव्हा तो कोणत्याही पोलीस स्थानकात त्याची तक्रार देण्यास जातो, त्यावेळी अनेकांना त्याच्या आगदी नेमका उलटा अनुभव येतो, हेच वास्तव पुन्हा-पुन्हा समोर येते आहे. पुणे शहरातील अनेक पोलीस स्थानकां मध्ये सर्व सामान्य माणसाला पोलीसांकडुन ‘दमदाटी च्या छड्या आणी गुन्हेगारांना पायघड्या’, याचा अनुभव येतो आहे, त्यामुळे पोलीसांबद्दल सामान्य माणसाच्या मनात कायमच भीती चे वातावरण असते.

एखादा नागरीक कष्टाच्या कमाईतुन घर घेतो आणि जेव्हा त्याची बांधकाम व्यावसाईक फसवणुक करतो, त्यावेळी तो पोलीस स्थानकाच्या पायर्‍या चढतो; मात्र ज्या अविर्भावात तेथील पोलीस त्याच्याशी संवाद साधतात, तेव्हाच तो खचून जातो.  

अशाच एका घटने मध्ये अलंकार पोलीस स्थानका मध्ये भुजबळ नावाच्या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकींचा गुन्हा दाखल झाला आहे. यात तक्रारदारांनी 7 सदनीका पूर्ण रक्कम भरुन 10 वर्षा पुर्वी नोंदवल्या होत्या, पण हा व्यावसायिक तक्रारदारांना सदनीकाच देत नव्हता. त्या बाबत तक्रारदार हा अनेक दिवसांपासुन या पोलीस स्थानका मध्ये चकरा मारत होता मात्र येथील पोलीस निरिक्षक, ही तक्रार दिवाणी आहे, न्यायालयाने स्टे दिला आहे, असे सांगून, त्याची बोळवण करीत होता. शेवटी तक्रारदाराने अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांचे कार्यालय गाठले व त्यांच्याकडे तक्रार केली. सेनगावकरांनी सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहीते यांना सदर तक्रारीची शहनिषा करण्याचा आदेश केला, त्या नुसार मोहीते यांनी तीन महीन्यात सर्व कागपत्रांचा अभ्यास करुन या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली. 

ज्यादिवशी सहायक पोलीस आयुक्तांनी संबंधित बांधकाम व्यावसायिका विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, त्याचवेळी त्यांचे पीत्त खवळले व तो राग त्यांनी तक्रारदारावर काढला. गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना रात्री 1 वाजे पर्यंत बसवून ठेवले आीण दुसर्‍या दिवशी गुन्हा दाखल केला. ‘सहायक पोलीस आयुक्तांचे 8 च दिवस राहीले आहेत, नंतर काय करणार, तपास तर मलाच करायचा’, हे तक्रारदाराला सांगायला त्या विसरल्या नाहीत. 

संबंधित अधिकार्‍याने बांधकाम व्यावसायिकांबरोबर झालेल्या सर्व व्यव्हाराचे मूळ कागदपत्रे हजर करा, असे जेव्हा त्यांनी तक्रारदाराला सांगीतले तेव्हा तक्रारदार घाबरून गेले. कारण मुळ कागदपत्रे जर पोलीसांनी गहाळ केली, तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणुन त्यांनी हा सर्व प्रकार पोलीस आयुक्तांच्या कानावर घातला, आयुक्तांनी मुळ कागदपत्रे बरोबर घेउन जा, तीथे दाखवा व सर्वांची छायांकीत प्रत जमा करा, असे त्यांना सांगीतले. विशेष म्हणजे तक्रारदाराकरीता दोन्ही वेळेस अत्यंत वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घातले होते, हे माहीती असूनही त्यांची त्या तक्रारदाराला त्रास देण्याइतपत मजल गेली. जिथे वरिष्ठ अधिकार्‍यांना हे पोलीस निरिक्षक जुमानत नाहीत, तिथे सामान्य माणसाची काय गत!